आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Special : Akshay Kumar Celebrating His 52 Birthday, 'Discipline, Dedication Is The Secret Of His Fitness'

Birthday Special : 52 वर्षांचा झाली तरी 25 वर्षांच्या तरुणांना लाजवतो अक्षय कुमार, कुटुंबीय म्हणाले, 'शिस्तीचे पालन आणि समर्पण आहे त्याच्या फिटनेसचे रहस्य' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमार 52 वर्षांचा झाला आहे. 9 सप्टेंबर 1967 ला अमृतसरमध्ये जन्मलेला अक्षय आजदेखील 25 वर्षांच्या तरुणासारखा फिट आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दैनिक भास्करने अनेक वर्षांपासून त्याच्या सोबत असलेल्या लोकांशी संवाद साधला आणि जाणून घेतले की त्याच्या फिटनेसचे रहस्य. त्याचा दिनक्रम पहाटे 4 वाजेपासून सुरु होतो. शूटिंगनंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तो घरी परततो, जेणेकरून त्याचे रात्री 9 वाजेपर्यंत झोपी जाण्याचे शेड्यूल गडबडू नये.  बॉडीगार्डपासून ते अॅक्शन डायरेक्टरपर्यंत जाणून घेऊयात कोण काय म्हणाले... 
अक्षय सरांच्या फिटनेसचे रहस्य त्याची शिस्त आहे. तो रात्री 9 वाजेपर्यंत झोपतो आणि सकाळी लवकर उठतो. रात्रीचे जेवण 6 वाजेच्याही आधी घेतो. जेणेकरून लवकर झोपू शकेल आणि  लवकर उठू शकेल. खाण्यापिण्याची तो विशेष काळजी घेतो. सकाळी 4 वाजता उठून आधी एक्सरसाइज करतो.  एक्सरसाइजमध्ये तो सर्वात आधी स्टेअरकेस चालतो आणि मग सायकिलिंग करतो. याव्यतिरिक्त स्किपिंग, रनिंग आणि जिम ट्रेनिंग करतो. मग 6 वाजेपासून त्याचे शूटिंगचे काम सुरु होते. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घरी येतो. 9 वाजेपर्यंत झोपून जातो. आउटडोर शूटमध्येदेखील सोडत नाही. 
- श्री ठेले 13 वर्षांपासून अक्षयचा बॉडीगार्डफिटनेसचे रहस्य आहे डिसिप्लिन... 
त्याचे लाइफस्टाइल परफेक्ट आणि इंस्पायरिंगदेखील आहे. मी विश करते की, मला अक्षयसारखा स्टॅमिना मिळेल. त्याचे लाइफस्टाइल त्याची स्किनचा ग्लो आणि त्याला हेल्दी ठेवते. ही लाइफस्टाइल सर्वांनी फॉलो केली पाहिजे. 
- कियारा आडवानी, अभिनेत्री20-25 वर्षांपूर्वीही एवढाच फिट होता - श्याम कौशल, अॅक्शन डायरेक्टर
अक्षय 20-25 वर्षांपूर्वीही एवढाच फिट होता, जेवढा आहे. त्याच्यात तेव्हापासून आतापर्यंत काहीही फरक पडला नाहीये. मग ते त्याच्या बॉडीची लवचिकता असो किंवा बॉडीच्या मुव्हमेंटवर असलेला कंट्रोल असो. सर्वकाही तेवढेच चांगले आहे जेवढे पूर्वी होते. मला तर असे वाटते की, तो वेलेण्यासार आणखीच फिट आणि चांगला झाला आहे.  
आजही जर सकाळी 5 वाजता शूटसाठी जायचे असेल तर तो 5 वाजता पोहोचतो. याचप्रकारे तो वर्कआउटसाठीही खूप डेडीकेटेड आहे. तो लहानपणी काम करायचा तो आजही काम करतो. 

बातम्या आणखी आहेत...