Home | Gossip | Birthday Special Akshay Kumar's Love Affairs

B'day: पूजा, शिल्पा, रविना, प्रियांका.. बरीच मोठी आहे 'खिलाडी कुमार'च्या गर्लफ्रेंडची लिस्ट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 09, 2018, 04:20 PM IST

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आज (9 सप्टेंबर) वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत.

 • Birthday Special Akshay Kumar's Love Affairs

  एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आज (9 सप्टेंबर) वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत. 9 सप्टेंबर 1967 मध्ये अमृतसरमध्ये जन्मलेला अक्षय टि्ंवकलसोबत लग्न करण्यापूर्वी साखरपुडा करण्यासाठी प्रसिध्द होता. अक्षय कुमारसोबत अफेअर्सची यादी मोठी आहे. त्याने अॅक्शन हीरो म्हणून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली होती, परंतु सर्व प्रकारचे सिनेमे करतो. तसेच अक्षय कुमारच्या सिनेमांप्रमाणेच अफअर्सच्या चर्चासुध्दा तेवढ्यात होत्या.

  अक्षय कुमारचे मॉडेल आणि अभिनेत्री पूजा बत्रा, शिल्पा शेट्टीपासून रेखा आणि प्रियांका चोप्रापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत अफेअरचे किस्से गाजले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अक्षयकडून मिळालेल्या धोक्यानंतर एका मुलाखतीत सांगितले होते, की अक्षयने तिचा वापर केला. मात्र आता दोघांमधील नाते सामान्य आहे.

  एकेकाळी अक्षय कुमारच्या प्रेमाचे किस्से खूप प्रसिध्द होते. त्याकाळच्या प्रत्येक प्रसिध्द अभिनेत्रीसोबत त्याचे नाव जुळले होते. रविना टंडन आणि शिल्पा शेट्टीसोबत त्याच्या अफेअरच्या चर्चा इतक्या लोकप्रिय झाल्या होत्या, की दोघींपैकी एकिशी अक्षय लग्न करणार असे वाटत होते. परंतु अखेर त्याने टि्ंवकल खन्नासोबत गाठ बांधली. 17 जानेवारी 2001ला अक्षय कुमार आणि टि्ंवकल खन्ना लग्नगाठीत अडकले.

  पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोण-कोणत्या अभिनेत्रींसोबत होते अक्षय कुमारचे अफेअर...

  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 • Birthday Special Akshay Kumar's Love Affairs

  पूजासोबत जुळले होते सूत... 


  अक्षय कुमार आणि मॉडेल आणि अभिनेत्री पूजा बत्रा यांच्यातसुध्दा अफेयर होते. त्यावेळी इंडस्ट्रीत स्ट्रगल करत होता आणि पूजा एक प्रसिध्द मॉडेल होती. अक्षयला पूजाच्या मदतीने मोठ-मोठ्या पार्ट्यामध्ये जाण्याची संधी मिळत होती. पूजा अक्षयसोबतच्या नात्यात गंभीर होती, मात्र काही लोकांचे म्हणणे होते, की अक्षयने करिअर घडवण्यासाठी तिची वापर केला. काही काळानंतर दोघे विभक्त झाले.

   

   

 • Birthday Special Akshay Kumar's Love Affairs

  आयशासोबत रोमान्स... 


  'खिलाडी' सिनेमा अक्षयच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरला. यासोबतच सिनेमाची अभिनेत्री आयशा जुल्कासोबत त्याच्या रोमान्सचे किस्सेसुध्दा समोर येऊ लागले होते. त्यानंतर दोघांनी अनेक सिनेमांत एकत्र काम कले.

   

 • Birthday Special Akshay Kumar's Love Affairs

  शिल्पासोबत होते अफेअर... 


  90च्या दशकात अक्षय आणि शिल्पा बॉलिवूडचे हॉट कपलपैकी एक होते. शिल्पा शेट्टीने स्वत: या गोष्टीचा स्वीकार केला होता, ती तिने आणि अक्षयने साखपपुडा केला होता. मात्र नंतर मतभेद निर्माण झाल्याने त्यांचे नात टिकू शकले नाही आणि दोघे वेगळे झाले.

   

 • Birthday Special Akshay Kumar's Love Affairs

  रविनासुद्धा होती गर्लफ्रेंड...  


  शिल्पा शेट्टीनंतर अक्षय कुमारचे नाव बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनसोबत जुळले होते. रविना टंडन एकेकाळी खूप ग्लॅमरस अभिनेत्री मानली जात होती. दोघांचे अफेअर तीन वर्षे चालले आणि नंतर दोघे वेगळे झाले.

   

 • Birthday Special Akshay Kumar's Love Affairs

  रेखासोबतसुध्दा होते अफेअर...


  आपल्या वयाच्या अभिनेत्रींसोबतच नव्हे, अक्षय कुमारच्या अफेअरच्या चर्चा वयस्कर रेखा यांच्यासोबतसुध्दा होते. हे अफेअर बॉलिवूडमध्ये आश्चर्यकारक रिलेशनशिपपैकी एक ठरले होते. 'खिलाडियो का खिलाडि' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली होती. 

   

 • Birthday Special Akshay Kumar's Love Affairs

  टि्ंवकल झाली पत्नी...  


  पत्नी टि्ंवकल खन्नासोबतसुध्दा अक्षय कुमारचे अफेअर होते. सांगितले जाते, की अक्षय टि्ंवकलसोबत लग्न करण्याच्या मूडमध्ये नव्हता. परंतु टि्ंवकलची आई डिम्पल कपाडिया यांच्या दबावामुळे अक्षयला टि्ंवकलसोबत लग्न करावे लागले. दोघांना दोन मुलेसुध्दा आहेत. 
   

 • Birthday Special Akshay Kumar's Love Affairs

  प्रेम आणि वाद... 


  लग्नानंतर अक्षय कुमारचे सर्वात वादग्रस्त अफेअर प्रियांका चोप्रासोबत होते. 'अंदाज' सिनेमाच्या शूटिंगवेळी प्रियांकाशी त्याची जवळीक वाढली. याची जाणीव टि्ंवकलला झाली. नंतर अक्षय आणि टि्ंवकल यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. नंतर अक्षयने प्रियांकापासून दूरावा ठेवला.
   

Trending