आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहे एव्हरग्रीन रेखाच्या सौंदर्याचे रहस्य, वयाच्या 65 व्या वर्षीही आघाडीच्या हीरोईन्सवर करतात मात 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक देखण्या अभिनेत्री होऊन गेल्या. पण रेखा यांच्यासारखे सौंदर्य क्वचितच बघायला मिळाले. आज (10 ऑक्टोबर) 65 वा वाढदिवस साजरा करणा-या रेखा वाढत्या वयात आणखीनच सुंदर दिसू लागल्या आहेत. खरं तर वयाच्या तिशी पस्तीशीनंतरच चेह-यावर वाढत्या वयाचा परिणाम दिसू लागतो. पण रेखा मात्र याला अपवाद ठरल्या आहेत.   वयाच्या 65 व्या वर्षी त्या विशीतील तरुणींना लाजवेल एवढ्या सुंदर दिसतात. आजही त्यांच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. वयाच्या या टप्प्यावर येऊनदेखील रेखा एवढ्या सुंदर कशी दिसतात? त्यांच्या सौंदर्याचे रहस्य आहे तरी काय? हे आज आम्ही वाचकांना सांगत आहोत. रेखा यांचे हे ब्युटी सीक्रेट्स तुम्हीदेखील फॉलो करु शकता. 

Fun time 🎉🎊🎊🎉

A post shared by Bhanurekha (@rekha_the_actress) on

आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींना सौंदर्यात देतात मात.. 

  • रेखा दररोज भरपूर पाणी पितात दिवसभरात त्या कमीत कमी दहा ते बारा ग्लास पाणी पितात. पाण्यामुळे आपल्या शरीरातील सर्व टॉक्सिंस आणि विषारी द्रव बाहेर पडतात. त्यामुळे शरीर आतून सुंदर बनतं आणि तुम्ही तरुण दिसू लागता. रेखा ही पद्धत अमंलात आणतात.
  • याशिवाय रेखा तळलेल्या वस्तू आणि अधिक प्रमाणात शिजलेले अन्न खात नाहीत.
  • वयाच्या या टप्प्यावर रेखा यांनी स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवले आहे. त्यांची स्लिम ट्रिग फिगर बघून आजच्या काळातील अभिनेत्रींना नक्कीच त्यांच्याविषयी इर्ष्या वाटू शकते. रेखा नियमित योगा आणि व्यायाम करतात.
  • रात्री आठ वाजेच्या पूर्वी त्या डिनर करतात आणि जेवणानंतर दोन तासांनी झोपतात. त्या आठ तासांची पूर्ण झोप घेतात. चांगली झोप झाल्याने तुम्ही ताजेतवाने राहता आणि थकवा निघून जातो. हे रेखा यांच्या सौंदर्याचे आणखी एक रहस्य आहे.
  • सुंदर आणि चेह-यावर ग्लो दिसावा यासाठी अनेक तरुणी कॉस्मेटिक्स आणि विविध क्रिम्सची मदत घेत असतात. पण रेखा आयुर्वेदाची मदत घेते. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून रेखा अरोमाथेरपी आणि आयुर्वेदिक स्पा ट्रिटमेंट घेतात.
  • रेखा शिस्तबद्ध लाइफस्टाइफ फॉलो करतात. याच कारणामुळे त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक चढ- उतारानंतरदेखील सौंदर्यावर त्याचा परिणाम झालेला दिसत नाही.
  • रेखा नैसर्गिक गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्या केसांसाठी आणि चेह-यासाठी नॅचरल फेसपॅकचा वापर करतात. केसांसाठी त्या आवळा, शिकेकाई, मेथी आणि नारळ तेल वापरतात.
बातम्या आणखी आहेत...