आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 'या' कारणामुळे भारत गणेशपुरे दुस-यांदा चढले होते बोहल्यावर, बसला होता सगळ्यांना आश्चर्याचा धक्का!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'चला हवा येऊ द्या' या शोमधून घराघरांत पोहोचलेले अभिनेते भारत गणेशपुरे यांनी याचवर्षी दुस-यांदा लग्न थाटले होते. 9 मे रोजी ते दुस-यांदा लग्नाच्या बेडीत अडकले. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्याच पत्नीसोबत दुस-यांदा लग्नगाठ बांधली. पत्नीसोबतच भारत यांनी पुन्हा थाटामाटात लग्न का केले, हा प्रश्न अनेकांना पडला होता. 


हे होते कारण... 
'चला हवा येऊ द्या'ची टीम काही महिन्यांपूर्वी परदेश दौ-यावर असताना भारत गणेशपुरे यांना सौम्य अटॅक आला होता. भारत यांचा ज्योतिषशास्त्रावर फार विश्वास आहे. त्यांनी तातडीने ज्योतिषाकडे हात दाखवला. तर त्यांच्या गुरुजींनी त्यांना पुन्हा एकदा लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे भारत यांनी वेळ न दवडता ज्योतिषाचे म्हणणे ऐकले आणि पुन्हा लग्नाचा निर्णय घेतला. लग्नासाठी 9 मेचा मुहूर्तही निश्चित केला आणि ठरल्यानुसार दोघे पुन्हा एकदा बोहल्यावर चढले. विशेष म्हणजे लग्नापूर्वी भारत आणि अर्चना यांना हळद देखील लागली. हळदीच्या कार्यक्रमाला श्रेया बुगडे आवर्जुन हजर होती.


हे देखील होती आणखी एक कारण...  
‘चला हवा येऊ द्या’च्या टीमसोबत  परदेश दौ-यावर असताना त्यांना कुटुंबीयांसोबत, पत्नीसोबत पुरेसा वेळ व्यतित करता आला नव्हता. शिवाय नव्या घरात शिफ्ट झाल्यापासून नातेवाईकांशीही भेटणं-बोलणं जमले नव्हते. व्यग्र कामकाजातून वेळ काढत सगळ्यांना एकत्र बोलवायचं कसं, असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यावर तुम्ही पुन्हा एकदा लग्न करा म्हणजे सगळेजण पुन्हा एकत्र येतील, असं गमतीशीर उत्तर श्रेया बुगडेनं दिलं होतं आणि भारत यांनी हे चांगलंच मनावर घेत थेट लग्नाचा मुहूर्त काढला होता.

 

रिसेप्शनला पोहोचली होती 'चला हवा येऊ द्या'ची टीम...

भारत यांनी त्यांच्या पत्नी अर्चना गणेशपुरे यांचे 18 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या दाम्पत्याला एक मुलगा आहे. या दोघांच्या दुस-या लग्नानंतर पार पडलेल्या रिसेप्शन सोहळ्याला मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. चला हवा येऊ द्याची टीम यावेळी भारत आणि अर्चना यांच्या आनंदात सहभागी झाली होती. डॉ. निलेश साबळे, श्रेया बुगडे आणि तिचे पती निखिल सेठ, सागर कारंडे आणि त्याची पत्नी यावेळी आवर्जुन हजर होते. पण भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांची अनुपस्थिती यावेळी जाणवली. याशिवाय अभिनेत्री अनिता दाते केळकर आणि प्रतिक्षा लोणकर यांनीही भारत-अर्चना यांच्या रिसेप्शनला उपस्थिती लावली होती.


आज भारत गणेशपुरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने बघुयात, त्यांच्या या दुस-या लग्नाची निवडक छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...