आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIRTHDAY: लाखोंच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा राहुल द्रविड असा पडला होता विजेता यांच्या प्रेमात!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्टस डेस्क - क्रीडा जगतात जेव्हा एखादा खेळाडू शिखरावर असतो तेव्हा त्याच्याशी संबंधित सर्व किस्से चाहत्यांमध्ये पसरतात. त्याची शानदार खेळी असो वा त्याच्या पर्सनल लाइफचे किस्से, चाहत्यांच्या कायम ओठांवर असतात. खेळाडूंचे पदार्पण असो निवृत्ती चाहते कायम त्यांच्या स्मृती जागवतच असतात.

 

असाच एका महान क्रिकेटपटू राहुल द्रविड आहे. खरेतर राहुलची ओळख करून द्यायची बिलकूल गरज नाही. राहुलने भलेही क्रिकेटमधून संन्यास घेतलेला असेल, परंतु आजही त्याचे रेकॉर्ड, त्याचा अंदाज पूर्ण जगतात क्रिकेटप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 11 जानेवारी 1973 रोजी राहुल द्रविडचा जन्म झाला होता. या खेळाडूची फलंदाजी आणि क्रिकेट करिअरबद्दल तर तुम्ही अनेक किस्से ऐकलेले असतील, परंतु तुम्हाला माहिती नसेल की, द वॉल नावाने प्रसिद्ध या खेळाडूची लव्ह स्टोरीही तेवढीच रोमांचक आणि रंजक आहे. 

 

मार्ग होत वेगवेगळे 
राहुल द्रविड आणि विजेता पेंढारकर यांनी 4 मे 2003 रोजी विवाह केला. पण त्यापूर्वीही कहाणी खूप रंजक आहे. वास्तविक, राहुलचा जन्म इंदुरात झाला, परंतु तो बंगळुरूत लहानाचा मोठा झाला. तर विजेता यांचे वडील एअरफोर्समध्ये होते, यामुळे त्या भारताच्या अनेक शहरांत राहिल्या. परंतु नंतर नागपुरात येऊन त्यांचे कुटुंब शिफ्ट झाले. द्रविड आणि विजेता यांचे मार्ग अगदी भिन्न होते. द्रविड क्रिकेटमध्ये आपली ओळख बनवत होता, तर विजेता यांनी वैद्यकीय शिक्षणाला पसंती दिली होती. परंतु प्रेम हे अजब रसायन आहे, दोन विरुद्ध दिशांनाही एकत्र आणण्याची ताकद त्यात असते. अगदी तसेच लाजऱ्याबुजऱ्या राहुलसोबतही झाले.

 

राहुल-विजेता यांच्या जन्मापूर्वीपासून दोघांच्याही वडिलांची घनिष्ठ मैत्री होती. जेव्हा विजेता यांचे वडील बंगळुरूत पोस्टेड होते (1968-71) तेव्हापासून या दोन्ही कुटुंबांचे एकमेकांकडे ऊठबस होती. परंतु तेव्हा दोघांनाही कल्पना नसेल की, मैत्रीचे हे रोपटे एका दिवशी नात्यांमध्ये बदलून जाईल. दोन्ही कुटुंबातील चांगल्या मैत्रीमुळे राहुल-विजेताही एकमेकांना भेटायचे आणि हळूहळू या भेटीगाठींनी दोघांतील प्रेम फुलवले.


विजेता या एक सर्जन आहेत. विशेष म्हणजे, जेव्हा द्रविडशी त्यांचे लग्न झाले तेव्हा लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या विजेता आहेत तरी कोण? याची खूप चर्चा झाली होती. दोघांचे लग्न अगदी साध्या पद्धतीने झाले. लग्नानंतरही विजेता- द्रविड माध्यमांसमोर आपल्या खासगी आयुष्याला आणत नाहीत. परंतु एका इंग्रजी दैनिकात छापलेल्या वृत्तानुसार, कुटुंबासाठी विजेता यांनी आपले प्रोफेशन सोडले. आता या दोघांच्या प्रेमरूपी संसाराच्या वेलीवर फुलांसारखी दोन मुले आहेत. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...