आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Special : Despite Being At The Pinnacle Of Success, Lata Mangeshkar Considers Herself An Ordinary Person.

यशाच्या उच्च शिखरावर असूनही स्वत:ला सामान्य व्यक्ती समजतात गानकोकिळा लता मंगेशकर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : गानकोकिळा लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला 90 वा वाढदिवस साजरा होत आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लतादीदी' म्हणून ओळखले जाते. त्या मीडियापासून दूरच राहतात. मात्र खास दैनिक दिव्य मराठीसोबत त्यांनी या वाढदिवसानिमित्त बऱ्याच विषयावर खास चर्चा केली... लतादीदींच्या चाहत्यांमध्ये पंडित नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी सर्वच आहेत. तुमचे गाणे ऐकून नेहरूजींच्या डोळ्यात अश्रू आले होते. आज तुम्हाला या शिखरावर पाहून त्यांची काय प्रतिक्रिया असती ? आज नेहरूजी असते तर त्यांना आनंद झाला असता. ते खरोखरच माझ्याशी अत्यंत आदराने आणि आपुलकीने वागले. इंदिराजीसुद्धा खूप प्रेमळ होत्या. जणू काही काेणी आपले भेटायला आले, असे त्या भेटत. अटलजी आणि इतर सर्वजण माझ्याशी चांगले वागले. या महापुरुषांना भेटताना माझ्या मनात विचार यायचा की, मी त्यांच्याशी जास्त बोलू नये कारण त्यांची जागा वेगळी आहे आणि आपण एक सामान्य व्यक्ती आहाेत. तुमची बहीण मीना मंगेशकर-खडीकर यांनी 'दीदी और मैं' पुस्तक लिहिले, याची प्रस्तावना अमिताभ बच्चन यांनी लिहिली. त्यांच्याशी जोडलेली एखादी आठवण सांगणार का ? खरं तर, अमितजी खूप मोठे कलाकार आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंबदेखील मोठे आहे. मी तिच्या घरी बऱ्याच वेळा भेट दिली आहे. ते खूप सभ्य लोक आहेत. ते बऱ्याच लोकांना मदत करतात. त्यांचे वडीलही मला भेटले हाेते, हे माझे भाग्य आहे. नरेंद्र शर्मा यांच्या घरी भेट झाली होती. ते एक महान कवी होते. मी त्यांना बाबा म्हणायचे. मी बच्चन सरांना सांगितले की, मी तुमचे पुस्तके व कविता वाचल्या आहेत. यावर ते म्हणाले- 'छान! आपण हे सर्व वाचले आहे! 'मी म्हणाले- हो मी वाचत असते. मलाही छान वाटले, तुला भेटून आनंद झाला आणि ते खूप भावुक झाले होते. ज्याप्रकारे आज गाण्याची निर्मिती होत आहे, गाण्याचे रिमिक्स होत आहे. लोक आज चित्रपट पाहतात, परंतु त्यांना जुनी गाणीच आवडतात. यावर काय म्हणाल? जुनी गाणी खरंच खूप चांगली होती. म्हणजे ज्या लोकांनी गायली होती, जी तयारी केली आहेत, जेवढे संगीत दिग्दर्शक होते, आता त्यापैकी कुणीही हयात नाहीत. जे मोठमोठे गायक होते - किशोर कुमार, मुकेशजी, मन्ना डे साहेब, तलत महमूद हेदेखील आता नाहीत. मी तर चित्रपटातील गाणी गाणे बंद केले आहे. आशादेखील कमीच गाते. आता काय होते हे आम्हाला माहीत नाही. एक-दोन गायकांची नावेच ऐकायला मिळतात. मी त्यांना ऐकले आहे. सुनिधी चौहान, श्रेया घोषाल चांगली गाते. सोनू निगमला गाण्याबाबत माहिती आहे. तोही चांगला गातो. रिमिक्स मला आवडत नाही. यातून चांगले काही मिळत नाही. गायकाला गाण्यासाठी नवीन काहीच नसते. २९ सप्टेंबरला 'दीदी और मैं' पुस्तकाचे विमोचन आहे. या पुस्तकात आपल्या जीवनातील चढ-उताराचा उल्लेख आहे. या चढउताराविषयी काही सांगाल का ? आयुष्यात बरेच चढउतार आले आहेत. मीना खूप लहान होती, तिला सर्व आठवते ते पाहून आश्चर्य वाटते. तिने पुस्तकात बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या मला आठवत नाहीत. मी 13 वर्षाची होते तेव्हापासून चढउतार पाहत आले आहे. त्यानंतर मी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. वडिलांच्या निधनानंतरच चित्रपटात काम केले. मग तेथून कोल्हापूरला गेले. एका कंपनीत पर्मनंट आर्टिस्ट होते, चित्रपटात मुलांची भूमिका करायची. अनेक चित्रपटांमध्ये नायक आणि नायिकेच्या बहिणीची भूमिका केली. मी १९४७ मध्ये एका हिंदी चित्रपटात गाण्यास सुरुवात केली, त्यानंतर सर्वांना माहीतीच आहे. आमचे बालपण खूपच वेगळे होते. तुम्हाला काही टीव्ही मालिका आवडत असल्याचे ऐकले होते ? सीआयडी पाहत होते. आमच्या घरी सर्वच पाहत होते. आम्हाला ते खूप आवडायचे. आता तर सीआयडी बंद झाले आहे. खरं तर, ते बऱ्याच लोकांना आवडते. आता एका चॅनलवर ते येते. त्यात जुने लोक आहेत. जुना ग्रुप होता तो आता दिसत नाही. जुने चित्रपट पाहत असते. याविषयी काहीच पाहत नाही. वाढदिवसाविषयी... वाढदिवसाबद्दल नेमके काय वाटते ? ऐकाल तर हसाल. वाढदिवस असतो त्या वेळी असे वाटते की, आपल्या आयुष्यातील अजून एक दिवस गेला. त्या वेळी कोणताही आनंद होत नाही. असे वाटते एक वर्ष होते ते वाया गेले. मी एक वर्ष गमावले. वय वाढतंय किंवा वाढदिवस होतो, त्या वेळी दुसऱ्यांसाठी काही तरी करावे. मदत करावी किंवा कुणाला काही कमी पडत असेल तर ते पूर्ण करावे. त्यामुळेच तुम्ही वाढदिवस थाटात साजरा करत नाही? हो, मी कधीही साजरा करत नाही, कारण वाढदिवस साजरा करायला मला आवडत नाही. या वर्षीदेखील असेच होईल. प्रत्येकाची घरात मोठी इच्छा आहे. त्या दिवशी अमावास्या आणि पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी आम्ही आमच्या पूर्वजांची उपासना करतो, त्यांना खाऊ घालतो. मग त्या दिवशी वाढदिवस साजरा करणे वेडेपणा ठरेल. दीदी सर्वात प्रेमळ - दोन बहिणींनी सांगितली लताची कथा बालपणापासून लतादीदींना मानते - आशा भोसले (लता मंगेशकर यांची धाकटी बहीण) लहानपणापासून मी दीदीला आपल्या आईप्रमाणे मानते. दीदी सोबत असतानाच्या अनेक गोष्टी आहेत. समजेना की, कोणती आधी सांगू. दीदी माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठ्या आहेत. जेव्हा मी लहान होते तेव्हा खूप जाड आणि गोलमटोल होते. दीदी मला खूप जीव लावायच्या. एकदा दीदीने मला कडेवर घेतले आणि सांगली येथील घरात मला त्या पायऱ्यांवरून खाली आणायला लागल्या. तेव्हढ्यात त्यांचा पाय निसटला आणि आम्ही दोघे गडगडत खाली पडलो. दीदी खाली आणि मी वर होते. दीदीच्या डोक्याला जबर मार लागला आणि माझ्या डोळ्याभोवती जखम झाली. ही जखम आजपण दिसते. जसजशी मी मोठी होत गेले तसतसे दीदी माझ्यासोबत होती. दीदी माझ्यावर खूप प्रेम करायची. वेळ पडली तर ती मला प्रचंड रागवायची. कारण मला खरे बोलण्याची सवय असल्याने मी सर्वांसमोर बोलत असायची. दीदी सांगायची आपल्या खासगी गोष्टी इतरांसमोर मांडायच्या नाहीत. बहिणीमध्ये दीदी माझ्यावर अधिक प्रेम करायची. दीदी जेव्हा शाळेत जायची तेव्हा मी ही त्यांचा हात पकडून जायचे. तेव्हा शाळेमध्ये खाली बसून शिकवले जायचे. चार-पाच दिवसांनी शाळेत शिक्षकाने मला बघितले आणि ही मुलगी कोण आहे, असे विचारले. तेव्हा दीदीने ती माझी बहीण आहे, असे सांगितले. दीदी आईसारखी आहे, तोंडावर गोडवे गात नाही - मीना मंगेशकर-खडीकर (लता मंगेशकर यांची धाकटी बहीण) आमचे वडील आम्हाला खूप कमी वयात सोडून गेले. दीदी १२ वर्षांची होती आणि मी १० वर्षांची. माझ्यापेक्षा लहान आशा, उषा आणि हृदयनाथ होते. पुण्याला आमची मावशी होती. तेथे आम्ही आलो होतो. मग दीदीवर संपूर्ण घराची जबाबदारी आली. दीदीने नंतर विनायकराव कर्नाटकी यांची कंपनी 'नवयुग' मध्ये सहभाग घेऊन चित्रपटात काम सुरू केले. त्या लहानपणापासूनच खूप चंचल होत्या. त्यांची आणि माझी जोडी जमली होती. कारण आमच्यात केवळ २ वर्षांचा फरक होता. त्यांना खेळ खूप आवडायचे आणि त्या गमती पण फार करीत. आम्ही बाहुल्या आणायचो आणि खेळायचो. त्यांना रंगावायचो. नंतर सजवून ठेवायचो. दीदीला सहगल हे खूप आवडायचे. सहगल यांचा देवदास हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी घरी आल्यावर त्यांच्यावर नाटक बसवले. मी आणि दीदीने त्यात काम केले होते. दीदी माझ्यासाठी देवासमान आहेत - मयूरेश पई (लताजींच्या कंपनीचे सीईओ) लतांसोबत १६ वर्षांपासून मयूरेश पै जोडले गेलेले आहेत. ते आज दीदींच्या 'एलएम म्युझिक'कंपनीचे सीईओ आहेत. पै सांगतात की, दीदींनी त्यांचा भाऊ हृदयनाथशिवाय सर्वाधिक गैरफिल्मी गाणी माझ्यासाठी गायली आहेत. दीदींसोबत माझी पहिली भेट १९९७ मध्ये त्यांच्या एका शोमध्ये झाली होती. मी त्यांना नमस्कार करायला गेलो होतो. परंतु दीदी जेव्हा समोर आल्या तेव्हा मी बघतच बसलो आणि त्या निघून गेल्या. नंतर २००२ मध्ये 'मेरे सांई...' याला संगीत दिले. त्या वेळी मी उषा दीदींना विचारले होते की, हे गाणे मला दीदींकडून गाऊन घ्यायचे आहे. त्या गातील का.? तेव्हा त्यांनी मी दीदीला विचारून सांगते, असे उत्तर दिले. मला पुढचे दोन-तीन महिने कोणताच निरोप आला नाही. त्यामुळे मला वाटले की, दीदीला माझे गाणे आवडले नसावे. मात्र एक दिवस अचानक समोरून दीदींनी फोन करून सांगितले की, मला गाणे आवडले आहे, मी गायला तयार आहे. यानंतर मी दीदींना दोन-तीन गाणी ऐकवली. त्यांना ती आवडली. आणि त्यानंतर आम्ही सुमारे १३ अल्बम सोबत केले. आज मी दीदींसोबत १६ वर्षांपासून काम करीत आहे. २०१३ मध्ये दीदींनी स्वत:ची म्युझिक कंपनी स्थापन केली आणि मला त्या कंपनीचा सीईओ केले. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे मला प्रेम मिळाले. जेव्हा दीदींच्या घरी जातो तेव्हा त्या खूप चांगल्या भेटतात. त्या लवकर उठतात. पूजा करतात. घरी त्यांना टीव्ही पाहायला आवडते. भाऊ आणि बहीण उषा एकत्र राहतात. त्या कुटुंबातील सदस्यांसमवेत बसतात आणि बोलतात. त्यांना प्रत्येकाच्या आवडी माहीत आहेत, त्यानुसार त्या वेळोवेळी भेटवस्तू देत असतात. कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकास भेट देतात. त्यांच्या दिवसाचा अर्धा भाग खरेदीसाठीच जातो.

बातम्या आणखी आहेत...