आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड द्या, सपोर्ट अॅक्ट्रेसचा नाही\' असे म्हणत या अभिनेत्रीने नाकारला होता पुरस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीपासून पुरुषप्रधानता आहे. यामध्ये महिलांना नेहमीपासूनच दुय्यम समजले जाते. परंतू आता हे स्टीरियोटाइप्स कंगना, प्रियांका आणि दीपिका सारख्या अभिनेत्री मोडत आहेत. परंतू याची सुरुवात 50 आणि 60 च्या दशकातच झाली होती. ज्यावेळी वैजयंतीमालासारख्या दाक्षिणात्य अभिनेत्रीला भारतीय फिल्म इंडस्ट्रीने आपली पहिली फीमेल सुपरस्टार म्हणून स्विकारले होते. 


13 ऑगस्ट, 1936 मध्ये वैजयंतीमाला यांचा जन्म झाला. त्यांनी अनेक स्टीरियोटाइप्स मोडले. याच कारणांमुळे त्यांना भारतीय चित्रपटाच्या इतिहासात पहिली महिला सुपरस्टार बनवले. आज त्यांच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही इंट्रेस्टिंग किस्से...

 

वयाच्या 13 वर्षी डान्स पाहून मिळाला पहिला चित्रपट 
वैजयंतीमालाने जेव्हा आपला पहिला चित्रपट 'वझकाई' (तामिळ) केला तेव्हा त्यांचे वय 13 वर्षे होते. 1949 मध्ये या चित्रपटाचा बॉलिवूडमध्ये रीमेक तयार करण्याता आला. दोन्हीही भाषांमध्ये वैजयंतीमाला यांचा अभिनय हिट ठरला. या चित्रपटात वैजयंतीमाला यांची निवड कशी झाली याचा एक किस्सा आहे. ए. वी. एन प्रोडक्शनचे एम.वी. रमण यांनी चैन्नईच्या गोखले हॉलमध्ये वैजयंतीमाला यांना भरतनाट्यम करताना पाहिले. 


पहिले त्यांनी पुर्ण परफॉर्मेंस पाहिला. तेव्हा त्यांनी ठरवले की, त्यांच्या चित्रपटात हीच हिरोइन असेल. अशा प्रकारे वैजयंतीमाला यांना हा चित्रपट मिळाला. त्यांनी चित्रपाटात जाऊ नये असे त्यांच्या आजीला वाटत होते. वैजयंतीमाला यांनी अभ्यासात, डान्स आणि संगीत यांच्यावर लक्ष केंद्रीत करावे असे त्यांना वाटत होते. 
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी...

 

 

बातम्या आणखी आहेत...