आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : लग्नानंतर खूप काळ बॉलिवूडपासून दूर असलेली प्रियांका चोप्रा आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियंकाला बर्थडेला एका शूटिंग लोकेशनवर सरप्राइज मिळते, जे पाहून ती इमोशनल होते. हा व्हिडीओ प्रियांकाच्या फॅन क्लबने इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.
प्रियांका आपल्या एक दशकाच्या सिने करियरमध्ये आतापर्यंत 40 चित्रपटात अभिनय केला आहे. तिने मागच्यावर्षी अमेरिकी सिंगर निक जोनाससोबत लग्न केले आहे. प्रियांका सध्या चित्रपट 'द स्काय इज पिंक'मध्ये काम करत आहे.
काय आहे व्हडिओमध्ये...
या व्हिडीओमध्ये हॉलिवूडच्या कोणत्यातरी शूटिंग लोकेशनवर आधी तर प्रियांका कुणासोबत तरी बोलताना दिसत आहे. पण अचानक काही फॅन्स तीन लेयरचा मोठ्या बर्थडे केकसोबत बर्थडे गाणे म्हणत येतात. हे बर्थडे सरप्राइज पाहून प्रियांका खूप हैरान होते आणि इमोशनल होऊन केक कापते. कदाचित्र हे शूटिंग यूनिटचेच तिचे काही साथीदार होते ज्यांनी 18 जुलैपूर्वी तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. प्रियांकाच्या या व्हिडिओवर फॅन्स खूप कमेंट करत आहेत. आणि प्रियांकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.