• Home
  • News
  • Birthday Special : In his 44 year of career, Rajinikanth never did brand promotions, even rejected offers worth over two crore

बर्थडे स्पेशल / 44 वर्षांच्या करिअरमध्ये रजनीकांत यांनी कधीच केले नाही ब्रँड प्रमोशन, दोन कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या ऑफरदेखील ठोकारल्या

फॅन्सच्या नजरेत देव आहेत रजनीकांत म्हणून राहतात एंडोर्समेंटपासून दूर 
 

दिव्य मराठी वेब टीम

Dec 12,2019 01:09:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : अभिनेते रजनीकांत आज ६९ वर्षांचे झाले आहेत. त्यांनी 1975 मध्ये आलेला तमिळ चित्रपट 'अपूर्वा रागंगल' मधून छोट्याश्या भूमिकेने चित्रपटात एंट्री केली होती. आता पर्यंत त्यांनी 160 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. पण 44 वर्षांच्या त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी कधीच ब्रँड एंडोर्स केले नाही. तीन तीन वर्षांपूर्वी यामागची काही करणे समोर आली होती.

अंडरवेअर - शूज ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी तयार नाहीत...

नॉर्थ इंडिया बेस्ड अॅड एजन्सी सेपियन्ट नित्रोचे स्ट्रेटेजिक हेड रोहिताश श्रीवास्तवने सांगितले होते, 'ते अंडरवेअर किंवा शूज ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी तयार नाहीत. ते हायर लेव्हलसाठी बनलेले आहेत. त्यांच्या फॅन्सला त्यांच्याकडून अपेक्षा नाही की, त्यांनी फॅन्सला सांगावे की, काय कंज्यूम करावे.' रिपोर्ट्सनुसार, जेव्हा एका कोला ब्रॅण्डने त्यांना 2 कोटी रुपयांपॆक्षा जास्तच्या ऑफरसोबत अप्रोच केले होते तेव्हा त्यांनी कंपनीच्या एग्जिक्यूटिव्हला भेटण्यासाठीही नकार दिला होता.

फॅन्सच्या नजरेत देव, त्यामुळे आहेत एंडोर्समेंटपासून दूर...

एक अॅड फिल्म्स आणि टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचे सीनियर एग्जिक्यूटिव्ह थेरॉन कारमेनने एका बातचितीदरम्यान सांगितले होते, की, रजनीकांत यामुळे कोणत्याही ब्रॅण्डला एंडोर्स करत नाही कारण त्यांना त्यांचे फॅन्स देव मानतात. ते म्हणता किम तुम्ही कधी देवाला कोक विकताना पहिले आहे का ? हे एकप्रकार्रे त्यांची प्रामाणिकता दाखवते.

ही एंडोर्समेंट वर्ल्डची एक फ्लिपसाइडदेखील आहे. जेव्हाही एखाद्या प्रोडक्टमध्ये काही खराबी निघते तेव्हा सेलिब्रिटीजला निशाणा केले जाते आणि त्यांच्याकडे बोट दाखवले जाते. हे कुणीच समजून घेऊ इच्छित नाही की, ब्रॅण्डने प्रमोशनमध्ये जे वचन दिले आहे. त्याच्या डिलीव्हरीच्या क्षमतेवर सेलेब्रिटीजचे काहीही नियंत्रण नसते. कदाचित एक कारण हेदेखील असावे ज्यामुळे रजनीकांत एंडोर्समेंटपासून नेहमी दूर राहतात.

X
COMMENT