आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहिती आहे का \'बाहुबली\' प्रभासला डार्लिंग कोण म्हणतं.. Birthday निमित्ता जाणून घ्या अशाच काही Facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - 'बाहुबली' म्हणजेच प्रभास आज (23 ऑक्टोबर) वाढदिवस साजरा करत आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर जगभरातील प्रेक्षक बाहुबली चित्रपटानंतर प्रभासचे फॅन बनले आहेत. पण हे यश प्रभासला सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी अनेक वर्षाची मेहनत त्यापाठीमागे आहे. ३ वर्षे कोणत्याही चित्रपटात काम न करता प्रभासने केवळ 'बाहुबली'साठी मेहनत घेतली. केवळ एवढेच नाही प्रभास बद्दल अशा अनेक गोष्टी असतील ज्या तुम्हाला नक्कीच माहिती नसतील.


आई वडिलांच्या पसंतीच्या मुलीशी करणार लग्न 
>> प्रभासचा जन्म चेन्नई येथे झाला. गोदावरी शहरातील मोगलातुरु हे त्याचे मुळ गाव आहे. 
>> प्रभास हा प्रसिद्ध अभिनेता कृष्णम राजू यांचा पुतण्या आहे. 
>> प्रभासच्या वडिलांचे नाव सुर्यनारायण तर आईचे नाव शिवा कुमारी असे आहे. त्याला प्रगती आणि प्रमोद अशी दोन भावंडे आहेत.
>> प्रभासचे खरे नाव व्यंकटा सत्यनारायणा प्रभास राजू उप्पलापती असे आहे.
>> प्रभासला त्याचे फॅन्स 'डार्लिंग' म्हणतात. त्याच्या जवळील लोक त्याला प्रभा, पब्सी आणि मिस्टर परफेक्ट असे म्हणतात.  
>> २००२ साली 'ईश्वर' चित्रपटाद्वारे प्रभासने तेलुगु चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. २००४ साली आलेला चित्रपट 'वर्षम' मुळे प्रभास स्टार बनला.
>> प्रभासचा आवाज चांगला असल्याने तो डबिंगही करतो.
>> प्रभासने बॉलिवूडमध्येही एंट्री केली आहे हे फार कमी जणांना माहित आहे. 'अॅक्शन जॅक्सन' चित्रपटात त्याने कॅमिओ केला होता
>> प्रभासला चॅरीटीद्वारे प्रसिद्धी मिळविणे आवडत नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो दरवर्षी लाखो रुपये चॅरीटीत देतो. नालागोंडा येथील अंध शाळेला त्याने 10 लाख रुपये दिल्याची माहिती मिळत आहे.
>> 'बाहुबली' चित्रपटासाठी प्रभासने ३ वर्ष कोणताही चित्रपट साईन केला नाही. केवळ 'बाहुबली'च्या तयारीसाठी त्याने हा वेळ घेतला आणि तो सार्थकीही लावला. 
>> चित्रपटातील परफेक्ट बॉडीसाठी प्रभास डाएट प्लानचे काटेकोरपणे पालन करत असे.
>> 'बाहुबली'साठी 'मिस्टर वर्ल्ड 2010' चा मानकरी असलेल्या लक्क्षण रेड्डीकडून त्याने बॉडी बिल्डींगचे धडे घेतले. 
>> प्रभास त्याच्या मनमिळाऊ आणि विनम्र व्यक्ती म्हणून ओळखला जातो. अहंकाराचा कुठलाही लवलेश त्याच्यात दिसत नाही हे त्याला जवळून ओळखणारा कोणताही व्यक्ती अथवा त्याचे फॅन्सही सांगतात
>> 'बाहुबली'च्या यशानंतर प्रभासला चित्रपटाच्या मेकर्सनी 1.5 कोटीची जीम गिफ्ट दिली होती. फॅट न वाढता त्याचे वजन वाढवण्यासाठी 'बाहुबली'ची टीम प्रयत्नशीलही होती
>> प्रभास त्याच्या आईवडिलांच्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न करणार आहे
>> प्रभासने भीमावरम येथून त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले आहे तर हैदराबाद येथील श्री. चैतन्य ज्यू. कॉलेजमधून इंजिनीअरींग केले आहे.
>> प्रभास हैदराबादी चिकन बिर्याणीचा चाहता आहे. 
>> हॉलिवूडचा Robert De Niro चा प्रभास फॅन आहे
>> जयासुधा, त्रिशा आणि श्रेया या त्याच्या आवडत्या अभिनेत्री आहेत.
>> प्रभासला राजकुमार हिरानी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. त्याने मुन्नाभाई एमबीबीएस, 3 इडिएट्स हे चित्रपट अनेक वेळेस पाहिले आहेत.
>> 'Geethanjali' आणि 'Baktha Kannappa' हे त्याचे आवडते चित्रपट आहेत. 
>> Fountain Head हे त्याचे आवडते पुस्तक आहे 
>> फावल्या वेळेत त्याला व्हॉलीबॉल खेळायला आवडते
>> गोपीचंद, अल्लु अर्जून हे इंडस्ट्रीतील त्याचे जीवलग मित्र आहेत. बाहूबली चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याची राणाशीही घट्ट मैत्री झाली आहे.
 

 

बातम्या आणखी आहेत...