आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Special Of Randeep Hooda, He Lost 18 Kg Weight In 25 Days For The Role Of Sarbjit

रणदीप हुड्डाने चित्रपटासाठी 25 दिवसात कमी केले होते 18 किलो वजन, चित्रपटाचे यूनिटही ओळखू शकत नव्हते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: रणदीप हुड्डा आज (20 ऑगस्ट) आपला 42 वा वाढदिवस साजरा करतोय. रणदीपच्या अॅक्टिंग स्किल्स सर्वांनाच माहिती आहे. पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाइफमध्ये त्याचे डेडिकेशन वाखनण्याजोगे आहे. याचा प्रत्यय सरबजीत चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आला. यावेळी स्वतःला त्या भूमिकेत सामावून घेण्यासाठी रणदीपने खाने-पिणे सोडले होते. 

 

कॉफी आणि पाणी पिऊन केली शूटिंग 
रणदीपने चित्रपटात सरबजीच्या भूमिकेसाठी स्वतः सतत उपाशी राहिला. चित्रपटातील भूमिकेत सत्यता यावी म्हणून त्याने कॉफी आणि पाणी पिऊन शूटिंग केली. यापुर्वी रणदीपने सरबजीत सारखे दिसण्यासाठी अवघ्या 25 दिवसात 18 किलो वजन कमी केले होते. 
- पहिल्या दिवशी रणदीप जेव्हा शूटिंगवर पोहोचला तेव्हा कोणीही यूनिट मेंबर त्याला ओळखू शकले नाही. डायरेक्टर ओमंग कुमारने जेव्हा त्याला आवाज दिला तेव्हा लोकांचे त्याच्याकडे लक्ष गेले. 

 

ड्रायव्हर, वेटर आणि कार वॉशरही राहिला आहे 
मेलबर्नमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना एका चायनीज रेस्तरॉमध्ये रणदीपने काम केले. तो कार वॉशरही राहिला आहे. त्याने वेटर म्हणूनही काम केले आणि दोन वर्षे टॅक्सी ड्रायव्हर बनवून काम केले. 
- सन 2000 मध्ये भारतात परत येऊन रणदीपने प्रायव्हेट एयरलाइनमध्ये मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम केले. यासोबतच त्याने मॉडलिंगही सुरु केली. 


रणदीपने तीन बायोपिकवर केले आहे काम 
रणदीप हुड्डाने आतापर्यंत 3 बायोपिक्सवर काम केले आहे. 2015 मध्ये आलेल्या चार्ल्स, 2016 मध्ये आलेला सरबजीत आणि तिसरा चित्रपट रंगरसिया हा होता. 
- 2001 मध्ये आलेल्या पहिला चित्रपट मानसून वेडिंगनंतर रणदीप जवळ सतत 4 वर्षे काहीच काम नव्हते. यानंतर रामगोपाल वर्माने त्याला 2005 मध्ये आपल्या डी चित्रपटासाठी साइन केले. 

 

बातम्या आणखी आहेत...