आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Special: OMG ... Is Kapil Ki Ranvir? Ranveer Shared It On The Occasion Of His Birthday 'First Look' In The Movie '83'

Birthday Special : OMG... हा कपिल की रणवीर ? रणवीरने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर केला '83' चित्रपटातील फर्स्ट लूक  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क :  बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा आज त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 6 जुलै 1985 ला मुंबई मध्ये झाला होता. सेलेब्रिटीज आपल्या बर्थडेला नेहमीच काही ना काही स्पेशल करत असतात. रणवीरनेही काहीसे असेच केले. रणवीरने यावेळी '83' चित्रपटातील आपला फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा चित्रपट कपिल देव कॅप्टन असताना म्हणजे 1983 चा वर्ल्ड कप जिंकला होता त्यावर आधारित चित्रपटाचे चित्रीकरण सध्या लंडनमध्ये सुरू आहे. या चित्रपटात रणवीर, कपिलची भूमिका साकारणार आहे. आज रणवीरने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी कपिल देवचा लूक शेअर केला आहे. या लूकला परफेक्ट बनवण्यासाठी निर्मात्याने मेकअप आर्टिस्ट आणि तंत्रज्ञांच्या एका खास टीमची मदत घेतली आहे आणि रणवीरने या दरम्यान कपिलसोबत वेळ घालवून त्यांची बॉडी लँग्वेज शिकून घेतली. याशिवाय त्यांच्या जुन्या मॅच आणि मुलाखती पाहून रणबीरला आपली भूमिका चांगल्या पद्धतीने समजून आणि सुधारण्यास मदत मिळाली. मेकअप टीमच्या मेहनतीवरही तो खूप खूष आहे. 

 

रणवीरने स्वतः शेअर केला आपला लूक आणि म्हणाला.... 
रणवीर सिंहने आपल्या बर्थडेआपल्या फॅन्सला एक खास गिफ्ट दिले आहे. त्याने कपिल देव यांच्या लुकमधील आपला पहिला लुक शेअर केला आहे आणि त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझ्या स्पेशल दिवशी प्रेजेंट द हरियाणा हुर्रिकेन कपिल देव.’ रणवीर सिंह पोस्टरमध्ये एक लाल रंगाचा लेदर बॉल हवेमध्ये झेलत आहे. लुक पाहून वाटते की, रणवीर सिंह बॉलिंग करणार आहे आणि समोर एक घातक फलंदाज आहे. त्याच्या डोळ्यामध्ये अग्रेशन दिसत आहे. 

 

रणवीर सिंहचा कपिल देव यांच्या भूमिकेतील पहिला लुक...