आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक वाढदिवसाला सुपरस्टार धर्मेन्द्र यांना येते आपल्या आईची आठवण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : बॉलीवुडचे गतकाळातील सुपरस्टार धर्मेंद्र यांचा आज 84 वा वाढिवस आहे. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 ला झाला होता. यानिमित्त त्यांची एक विशेष मुलखात तुमच्यासाठी... 

धरम पाजी म्हणतात..., आई गेल्यानंतरवाढदिवसाला तिची एवढी आठवण येते की, तिचा फोटो पाहात राहातो... 

तुमच्याकडे प्रत्येक वाढदिवसाला हवन करून दिवसाची सुरुवात करण्याची परंपरा आहे ? 


आमच्याकडे प्रत्येक वाढदिवसाला हवन करण्याची परंपरा माझ्या आईने सुरु केली होती. आता जेव्हा जन्म देणारीच राहिली नाही तेव्हा वाढदिवस साजरा करण्याची मजा येत नाही. केवळ आईची आठवण काढत पूजा हवन करतो. 

बालपणी आईसोबत साजरे केलेल्या वाढदिवसाचे काही किस्से सांगाल ?


माझ्या वाढदिवसाच्यादिवशी माझी सर्वांना एकत्र बोलवायची. ती म्हणायची आज सर्वजण लवकर उठून तयार राहा. ती खूप प्रेमळ होती. चांगल्या प्रकारे हे सेलिब्रेशन करायची. आम्हा मुलांना चांगले चांगले पदार्थ करून खाऊ घालायची. लिफाफे सुद्धा द्यायची. त्या दिवशी एखाद्या गरजवंताला आवर्जून मदत करायची. माझे जुने कपडे गरजवंताला देऊन यायची. पाकला तर सांगतही नव्हती आणि अलमारी उघडून स्वतःच कपडे घेऊन इतरांना द्यायची. जेव्हा पासून आई गेली आहे तेव्हापासून या दिवशी तिची खूप आठवण येते. तिची एवढी आठवण येते की, फक्त तिचा फोटो पाहात राहातो. तो फोटो समोर ठेऊनच हवन करतो. आईच्या जाण्याचे एवढे दुःख आहे की, वाढदिवस थोडा साधेपणानेच साजरा करतो. 

तुमचे आईवर एवढे प्रेम आहे, वडिलांबद्दल काही सांगाल ?


वडील खूप प्रेम करायचे, पण पिता कधीच ते दाखवत नाहीत. आईपेक्षाही खूप जास्त वडिलांचे प्रेम असते. ते आपल्या आतच ठेवतात दाखवत नाहीत. असेच माझ्या वडिलांचे माझ्यावर प्रेम होते. 

तुमची मुले मुली यादिवशी तुमच्यासाठी काय विशेष करतात ?


असे काही नाहीये. आम्ही सर्व तेच गावाकडचे आहोत. आम्हाला यामध्ये काही फार विशेष वाटत नाही की, आज वाढदिवस आहे. ज्याप्रकारे लोक गावामध्ये सर्वांना प्रेमाने भेटतात त्याचप्रकारे आम्ही वाढदिवसाजरा करतो. आम्ही तर हे सर्व गावामध्ये काही पाहिलेही नव्हते. मुंबईमध्ये यौन कळाले की, वाढदिवस साजरा करा... हेदेखील करा, तेही करा. ही लोकांची ड्रामेबाजी आहे. ते सर्व आम्ही करत नाही. हो, नातवंडांच्या आनंदासाठी त्यांना कुठेतरी घेऊन जातो. यावेळी कुठे घेऊन जैन अजून काही ठरलेले नाही. मी कधीच प्लॅन करून काहीही करत नाही. मी असाच निघतो. हो, हे मात्र आहे की, माझे चाहतेही एक दिवस अगोदरपासूनच यायला सुरुवात होते. लोक एवढ्या प्रेमाने येतात, त्यांचे मन राखावे लागते. प्रेमाची प्रारठण प्रेमाने केली पाहिजे. मी खाली उतरून सर्वांना भेटतो. प्रेमापेक्षा जास्त छान गोष्ट कोणतीच नसते. ते सर्वांच्या आत भरभरून असते. स्वतःसाठीच नाही सर्वांसाठी प्रेम आहे. ते स्पष्टपणे दिसते त्यापेक्षा मोठा उत्सव काय साजरा करणार.