Home | Gossip | Birthday Special : Once Sara Ali Khan's weighed was 96kg, now became a Bollywood star

Birthday Special : एकेकाळी 96 किलो होते सारा अली खानचे वजन, आता आपल्या अदाकारीने करते आहे सर्वांनाच घायाळ 

दिव्य मराठी वेब, | Update - Aug 12, 2019, 11:40 AM IST

​​​​​​​फीटनेसच्या जोरावर तिने व्होग मॅगझीनच्या कव्हर पेजवर आपली जागा बनवली आहे

 • Birthday Special : Once Sara Ali Khan's weighed was 96kg, now became a Bollywood star

  बॉलीवूड डेस्क : सारा अली खान आज २४ वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 12 ऑगस्ट 1995 ला झाला होता. सारा सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आहे आणि आता तिने बॉलिवूडमध्ये आपली एक भक्कम जागा मिळवली आहे. सारा अली खानच्या सौंदर्याचे चर्चे तिच्या फिल्म डेब्यू पूर्वीच सुरू झाले होते. तिच्या स्टाइल आणि परफेक्ट फिगरवर फँस फिदा आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, सारा आधी इतकी फीट नव्हती. एकेकाळी सारा खूप लठ्ठ होती, आणि तिचे वजन 96 किलो झाले होते. यानंतर कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने आपले ट्रांसफॉर्मेशन करून घेतले. आज आपल्या फीटनेसच्या जोरावर तिने व्होग मॅगझीनच्या कव्हर पेजवर आपली जागा बनवली आहे. हल्लीच साराने आपल्या वजन कमी करण्याच्या सीक्रेटवर व्होगसोबत चर्चा केली.

  आळस सोडून मेहनतीला दिली जागा
  साराने सांगितले की, हे सगळे तेव्हा सुरू झाले, जेव्हा ती ग्रॅजुएशनसाठी न्यूयॉर्कला गेली होती. कॉलेज सुरू झाले तेव्हा तिचे वजन 96 किलो होते. त्यावेळी ती फक्त आणि फक्त अभ्यासावरच लक्ष देत होती. पण शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात तिने वजन कमी करण्याचे ठरवले. तिने पिझ्झावरून सलाडवर आली आणि आळस सोडून मेहनत करणे सुरू केले.

  जास्त वजन असल्यामुळे हेवी वर्कआउट करताना त्रास व्हायचा
  तिने सांगितले की, 'न्यूयॉर्क शहरात फिटनेसशी संबंधीत अनेक क्लास होते. तिथे फंक्शनल ट्रेनिंगपासून बॉक्सिंग आणि सायकलिंग उपलब्ध होते. माझे वजन खूप जास्त असल्यामुळे मी हेव्ही वर्कआउट करू शकत नव्हते. त्यामुळे मी सायकलिंग, वॉकिंग आणि ट्रेडमिलवर पळणे सुरू केले. यामुळे माझे वजन खूप कमी झाले.'

  प्र​​​​​​​तिदीन 1 ते दीड तास वर्कआउट
  'यानंतर मी ही वर्कआउटला माझे रुटीन बनवले आणि हेव्ही वर्कआउट करणे सुरू केले. त्यासोबतच बॉक्सिंग, कार्डियो आणि फंक्शनल ट्रेनिंगची सुरूवात केली. मी रोज 1 ते दीड तास वर्कआउट करणे सुरू केले. रविवारी सुट्टी घ्यायचे.

  लव्ह आज कलच्या सीक्वेलमध्ये दिसेल सारा
  साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या इम्तियाज अलीच्या लव्ह आज कलच्या सीक्वलमध्ये काम करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन आहे. चित्रपटाच्या पहिल्या पार्टमध्ये तिचे वडील सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण होते.

 • Birthday Special : Once Sara Ali Khan's weighed was 96kg, now became a Bollywood star
 • Birthday Special : Once Sara Ali Khan's weighed was 96kg, now became a Bollywood star

Trending