आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Special : People Would Once Say, 'You Will Never Play A Lead Role In A Movie'

Birthday Special : एकेकाळी लोक सरळ म्हणायचे, 'तू चित्रपटामध्ये कधीही मुख्य भूमिका करू शकणार नाहीस'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आज आयुष्मान खुराणाचा ३५ वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 14 सप्टेंबर 1984 ला झाला होता. चित्रपटासाठी नेहमी ऑडिशन देत होतो. 2006 मध्ये जेव्हा मी मुंबईला आलाे तेव्हा एका खोलीत एकाच व्यक्तीचे ऑडिशन घेतले जात होते. नंतर 2007 मध्ये आलो तेव्हा एकाच खोलीत बऱ्याच लोकांचे ऑडिशन घेतले जात होते. सर्वांना एकमेकांसमोर ऑडिशन द्यावे लागत होते. तेव्हा एका वर्षात इतका कसा फरक पडला याचा मी विचार करत होतो. मी सर्वांसमोर ऑडिशन देणार नाही, असे जेव्हा मी कास्टिंग डायरेक्टरला सांगितले. यावर कास्टिंग डायरेक्टर म्हणाला, तुम्ही स्वत: ला स्टार समजता का ? मी त्याला सांगितले- स्टार समजण्यासारखे काही नाही. मी सुधारणेवर विश्वास ठेवतो आणि जर कोणी मला कॉपी केले तर ते माझे नुकसान होईल. मला सर्वांसमोर ऑडिशन द्यायचे नाही. माझे ऑडिशन सर्वात शेवटी घ्या, असे मी त्यांना म्हणालो. मात्र हे ऐकून त्यांनी मला बाहेर काढले. ते म्हणाले, येथे आपल्या पसंतीने ऑडिशन नंबर मिळत नाही, आता नंबर आला तर तुम्हाला आताच ऑडिशन द्यावे लागेल. अशा प्रकारे, मी ते ऑडिशन दिलेच नाही. या घटनेला कोणी माझा अहंकार मानू नये. मी अहंकारी नाही. पण त्यावेळी ते करणे आवश्यक होते.आयुष्यात बऱ्याच गोष्टी चांगल्या घडत असतात, त्यामुळे आपल्याला आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. असे बरेच लोक होते जे मला सांगत असत की, तू मुख्य भूमिकेसाठी योग्य नाहीस. ते लोक थेट माझ्या तोंडावर बोलत असत. मात्र मी कधीही निराश झालो नाही. त्याऐवजी, जीवनात काही तरी नक्कीच चांगले करायचे, असे मी ठरवले. मला स्वत: ची आणि माझ्या क्षमतेबद्दल खात्री होती. मी एक दिवस मुख्य भूमिका साकारेल, हा आत्मविश्वास होता. हा आत्मविश्वास नसता तर कदाचित मी मुंबईत अभिनेता बनलाे नसतो तर आयुष्यात काहीतरी वेगळे केले असते.
 

बातम्या आणखी आहेत...