आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Special Rekha And Mukesh Agarwal Controversial Marriage And Suicide Story

रेखाच्या ओढणीने गळफास घेऊन मुकेश अग्रवाल यांनी केली होती आत्महत्या, असे होते दोघांचे वैवाहिक आयुष्य 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुकेश अग्रवाल आणि रेखा - Divya Marathi
मुकेश अग्रवाल आणि रेखा

मुंबईः रेखा यांचे चाहते अगणिक आहेत, मात्र रेखा अमिताभ बच्चन यांच्या चाहत्या होत्या. सत्तरच्या दशकात रेखा आणि अमिताभ यांच्या प्रेमाचे किस्से अनेक वृत्तपत्रांमध्ये चर्चिले गेले होते. मात्र अचानक रेखा आणि अमिताभ यांचे मार्ग विभक्त झाले. अमिताभ यांनी पुन्हा कधीही रेखा यांच्याकडे वळून पाहिले नाही. रेखा यांनी 1990 मध्ये दिल्लीतील एका उद्योगपतीसोबत लग्न केले. मुकेश अग्रवाल हे रेखा यांच्या पतीचे नाव. ते आपल्या काळातील प्रसिद्ध हॉटेल लाइन ग्रुप आणि निकिताशा ब्रॅण्डचे मालक होते. दुर्दैवाने दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या वर्षभरातच म्हणजे 1991 मध्ये मुकेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी बातमी आली होती, की मुकेश यांनी रेखा यांच्या ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. इतकेच नाही, तर त्यांच्या निधनानंतर रेखा यांना त्यांच्या नात्यात कोणत्या कारणामुळे मतभेद निर्माण झाले, असे प्रश्न उघडपणे विचारण्यात आले. 'रेखा : द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात खासगी गोष्टींचा खुलासा यासिर उस्मान यांच्या 'रेखा : द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात रेखा यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यासिर उस्मान यांनी या पुस्तकात रेखा यांच्या वैवाहिक आयुष्याविषयी उल्लेख केला आहे. ऑटोबायोग्राफीत रेखा यांनी पती मुकेश अग्रवाल यांच्याकडे पाठ का फिरवली होती, लग्नाच्या वर्षभरातच मुकेश यांनी आत्महत्या का केली, याविषयीचा उलगडा करण्यात आला आहे.  मुकेश यांनी घातली होती रेखाला लग्नाची मागणी... यासिर उस्मान यांनी पुस्तकात केलेल्या उल्लेखानुसार, 4 मार्च 1990 च्या दुपारी (पहिल्या भेटीच्या महिन्याभरानंतर) मुकेश अग्रवाल सुरिंदर कौर (रेखाची मैत्रीण) सोबत रेखा यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना लग्नाची मागणी घातली. मुकेशचा उत्साह बघून रेखा अवाक् झाल्या होत्या.  त्याकाळात दोघांचेही कुटुंब मुंबईत नव्हते. तरीदेखील त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. संध्याकाळी रेखा लाल रंगाची कांजीवरम साडी परिधान करुन मुकेश यांच्यासोबत लग्नासाठी मुंबईतील मुक्तेश्वर मंदिरात पोहोचल्या. शेजारीच इस्कॉन मंदिर होते. मात्र गर्दीमुळे हे कपल तिथे गेले नाही. रात्री जेव्हा मुकेश आणि रेखा मुक्तेश्वर मंदिरात पोहोचले, तेव्हा तेथील पुजारी संजय बोडस झोपले होते. मुकेश यांनी त्यांना उठवले आणि लग्न करायचे असल्याचे सांगितले. संजय रेखाला बघून चकित झाले. कारण रेखा नेहमीच त्या मंदिरात दर्शनासाठी येत होती. पण ती मुकेशसोबत लग्नासाठी तेथे आल्याचे समजल्यानंतर संजय बोडस चकित झाले होते. रात्री 10.30 वाजता पुजारीने त्यांचे लग्न लावले. त्यावेळी मुकेश 37 तर रेखा 35 वर्षांच्या होत्या रेखा आणि मुकेश यांचा हनीमून  लग्नाच्या 24 तासांनी रेखा आणि मुकेश हनीमूनसाठी लंडनला रवाना झाला. लग्नानंतरचे सुरुवातीचे काही खूप दिवस छान गेले. कारण रेखा आणि मुकेश पहिल्यांदाच एकत्र एवढा वेळ घालवत होते. मात्र आठवड्याभरातच रेखा यांना उमगले की, मुकेश आणि त्या एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. मुकेश दिवसभरात भरपूर औषधे घेत असल्याने रेखा हैराण झाल्या होत्या. मात्र आता आयुष्यभराची सोबत असल्याने रेखा यांनी याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले. रेखा स्वतःशी बोलताना म्हणायच्या, मला यांना यातून बाहेर काढायचे आहे. मी ठरवले तर ती काय करु शकत नाही? दोघे लंडनमध्ये आठवड्याभरापेक्षा जास्त वेळ थांबले होते. मुकेश सतत अस्वस्थ असल्याचे रेखा यांना जाणवत होते. एकेदिवशी मुकेश यांनी खिन्न मनाने रेखाच्या डोळ्यांत पाहिले आणि माझ्या आयुष्यात AB असल्याचे त्यांनी  सांगितले. मुकेश यांच्या आयुष्यात कोण होती ही AB?  मुकेश यांनी रेखाकडे ज्या AB चा उल्लेख केला होता, ती त्यांची सायकोथेरेपिस्ट आकाश बजाज होती. ती 10 वर्षांपासून त्यांच्यावर उपचार करत होती. आकाश या घटस्फोटित आणि मोनिशा आणि अंजली या दोन मुलींची आई होती. यासेर उस्मान यांच्या पुस्तकात केलेल्या उल्लेखानुसार, आकाश आणि मुकेश हे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. मुकेश आकाश आणि त्यांच्या दोन्ही मुलींसोबत नेहमी हॉलिडेवर जात असे. हे चौघे म्हणजे जणू एक हॅपी फॅमिली होती. पण रेखासाठी मुकेश यांनी आकाशसोबतचे नऊ वर्षांचे रिलेशन संपुष्टात आणले होते. मुकेश यांनी रेखासोबत लग्नाचा निर्णय घेतल्याचे आकाश यांना सांगितले नव्हते. आकाश यांच्यानुसार, मुकेश यांनी मला लग्नाची मागणी घातली होती. पण मला माझ्या मुलींची जबाबदारी त्यांच्यावर सोपवायची नव्हती. मीच मुकेश यांना लग्न करुन सेटल होण्याचा सल्ला दिला होता.  रेखासोबत त्यांनी लग्न केल्याचे हे मला त्यांनी सांगितले नव्हते. त्यांच्या लग्नाची बातमी माझ्यासाठी हैराण करणारी होती. एप्रिल 1990 मध्ये दुस-यांदा केले होते... 4 मार्च 1990 रोजी मुकेश आणि रेखा यांनी मुंबईत लग्न केले होते. या लग्नाच्या महिन्याभरानंतर या दोघांनी पुन्हा एकदा लग्न थाटले होते. यासेर उस्मान यांच्या पुस्तकात असलेल्या उल्लेखानुसार, मुकेश आणि रेखा यांनी तिरुपती मंदिरात दुस-यांदा लग्न केले होते. वैदिक पद्धतीने दोघांनी लग्न केले होते. या लग्नाला रेखा यांची आई पुष्पावली उपस्थित होत्या. विशेष म्हणजे त्यांचे वडील जेमिनी गणेशन यांनीही या लग्नाला उपस्थिती लावली होती. वडिलांची उपस्थिती ही रेखा यांच्यासाठी एक आश्चर्याचा धक्काच होती. जेमिनी यांचे फिल्ममेकर मित्र राघवेन्द्र हेदेखील नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. रेखा यांच्या नवीन आयुष्याची ही सुरुवात होती. वैवाहिक आयुष्यात आले वादळ...  1990 साली लग्नानंतर जागतिक मंदीमुळे मुकेश यांना व्यवसायात खूप मोठे नुकसान झाले होते. पण त्यांनी ही गोष्ट रेखापासून लपवून ठेवली होती. नंतर मात्र रेखा यांना याविषयी समजले. येथूनच त्यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा निर्माण होऊ लागला. लग्नाच्या दोन महिन्यांनी रेखा यांनी दिल्लीच्या वा-या कमी केल्या. दीर्घकाळ रेखाची अनुपस्थिती मुकेश यांना सहन होऊ शकली नाही. रेखा यांनी चित्रपटसृष्टी सोडून दिल्लीत त्यांच्यासोबत राहावे, अशी त्यांची इच्छा होती. पण लग्नापूर्वीच रेखा यांनी चित्रपटसृष्टी सोडणार नसल्याचे मुकेश यांच्याकडे स्पष्ट केले होते. फक्त प्रेग्नेंट राहिल्यानंतरच चित्रपटात काम करणार नसल्याचे रेखा यांनी मुकेश यांना सांगितले होते. जेव्हा मुंबईत वेळ घालवू लागले मुकेश..  रेखा चित्रपटसृष्टी सोडणार नसल्याचे बघून आणि व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे मुकेश रेखा यांच्यासोबत मुंबईतच राहू लागले. ते अनेकदा रेखा यांच्या चित्रपटांच्या सेटवर आणि फिल्मी पार्टीजमध्ये दिसू लागले होते. मुकेश यांना बघून याच्यासोबत रेखाने लग्न केले का? अशी कुचबूज होऊ लागली होती. मुकेशचे सतत सोबत असणे रेखा यांच्यासाठी लाजिरवाणे ठरु लागले होते. पण मुकेश यांना याविषयीची काहीच कल्पना नव्हती. याचकाळात मुकेश यांनी रेखाची भेट राजीव गांधींसोबत घालून दिली होती. शिवाय बिझनेसच्या निमित्ताने ग्वाल्हेरला जाऊन माधवराव सिंधियाची भेट घेण्याची इच्छा मुकेश यांनी रेखाकडे व्यक्त केली होती. पण एकेदिवशी रेखा यांनी मुकेश यांच्याकडे स्पष्ट केले, की त्यांना त्यांच्या व्यवसायात मुळीच रस नाही. मुकेश यांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न...  लग्नानंतरचा तीन महिन्यांचा काळ रेखा यांच्यासाठी भयावह ठरला. काही वेळ काढून रेखा यांनी गोष्टी समजण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती हाताळण्यायोग्य नसल्याचे समजल्यानंतर रेखा यांनी मुकेश आणि त्यांच्या कुटुंबीयांपासून फारकत घ्यायला सुरुवात केली. इतकेच नाही तर त्यांनी मुकेशचे फोन घेणे बंद केले. डिप्रेशनमध्ये असलेल्या मुकेश यांच्यासाठी हा एक मोठा धक्का होता. रेखासोबत निर्माण झालेल्या दुराव्यामुळे मुकेश यांनी 1990 मध्ये झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर रेखा यांनी मुकेश यांना फोन करुन स्पष्ट केले होते की, त्यांच्या या नात्याचे काहीच भविष्य नाही. रेखा म्हणाल्या होत्या, मी खोट्या जगात वावरणारी स्त्री नाही. ज्या नात्याचे काहीच भविषय नाही, असे नाते संपवणेच योग्य. घटस्फोटाविषयी झाली होती चर्चा..  यासेर उस्मान यांच्या पुस्तकात करण्यात आलेल्या उल्लेखानुसार, मुकेश यांनी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मुकेश यांच्या मित्र आणि कुटुंबीयांना त्यांना सांभाळणे कठीण झाले होते. मुकेश फ्रस्टेड आणि डिप्रेस्ड झाले होते. 10 सप्टेंबर 1990 रोजी फोनवर मुकेश आणि रेखा यांचे दीर्घ संभाषण झाले होते. दोघांनी घटस्फोटाचा निर्णय सहमतीने घेतला होता. 26 सप्टेंबर 1900 रोजी रेखा स्टेजशोसाठी अमेरिकाला रवाना झाल्या. 2 ऑक्टोबर 1990 रोजी मुकेश यांनी त्यांचे फार्महाउस बसेरा (छतरपुर, नवी दिल्ली) च्या बेडरुममध्ये रेखा यांच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रेखा यांच्या चित्रपटांच्या पोस्टर्सवर फासण्यात आले होते काळे..  1990 साली रेखा आणि जितेंद्र स्टारर 'शेषनाग' हा सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमाच्या रिलीजच्या काही दिवसांतच मुकेश यांनी आत्महत्या केली होती. याकाळात लोकांनी रेखा यांच्या सिनेमांच्या पोस्टर्सना काळे फासले होते. अनेक ठिकाणी त्यांच्या पोस्टर्सवर लोकांनी शेण फेकले होते. त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मीडियामध्ये मुकेश यांच्या आत्महत्येच्या बातम्या आक्षेपार्ह मथळ्याने प्रकाशित करणे सुरु केले होते, उदाहरणार्थ शो टाइम मॅगझिनने नोव्हेंबर 1990 च्या अंकात द ब्लॅक विडो हे शीर्षक दिले होते. तर सिने ब्लिट्जने द मकैब्रे ट्रुथ बिहाइंड मुकेश सुसाइड या मथळ्याने वृत्त प्रकाशित केले होते. तर काहींनी रेखा एक्सपोज्ड तर काहींनी रेखाचे नव-याचे आश्चर्यचकित करणारा भूतकाळ या मथळ्याने बातम्या प्रकाशित केल्या होत्या. काय म्हणाले होते मुकेश यांचे मित्र अनिल गुप्ता आणि आकाश बजाज..  मुकेश यांचे मित्र अनिल गुप्तांनी त्यावेळी म्हटले होते, माझ्या भावाचे रेखावर खरे प्रेम होते. तिच्या प्रेमासाठी प्रेम करा किंवा मरा अशी त्याची अवस्था झाली होती. रेखाने त्याच्यासोबत जे केले, त्याकडे डोळेझाक केली जाऊ शकत नाही. तिला आता काय हवंय, आमचा पैसा हवाय का तिला? तर आकाश बजाज म्हणाल्या होत्या, मुकेशच्या निधनाने मला मोठा मानसिक धक्का बसला आहे. जिच्यामुळे असे घडले, तिचा मला अतिशय राग आहे. तिने असे का केले, याचा जाब मला तिला विचारायचा आहे. या व्यक्तीच्या मध्यस्तीने झाले होते रेखा-मुकेशचे लग्न...  मुकेश हे रेखा यांचे मोठे चाहते होते. 1990 साली मुकेश यांनी त्यांच्या फॅशन डिझायनर असेलल्या मैत्रीण बीना रमानी यांना फोन करुन रेखा यांचा फोन नंबर मागितला होता. रेखा यांनी एकदा सांगितले होते, की बीना यांनीच मुकेश यांच्यासोबत तिची पहिली भेट घालून दिली होती. बिनाच्या आग्रहाखातर रेखा मुकेशसोबत फोनवर बोलल्या होत्या. पहिली बातचित फॉर्मल होती. हळूहळू दोघांमध्ये बोलणे वाढले. दोघांची पहिली भेटसुद्धा मुंबईतच झाली होती. दोघांचे नाते जोडण्यात बीना रमानी आणि दिल्ली बेस्ड सुरिंदर कौर यांची महत्त्वाची भूमिका होती.