• Home
  • Bollywood
  • Gossip
  • Birthday Special : Rishi Kapoor says 'I am the only actor who wholeheartedly supports women centric films'

Birthday / Birthday Special : ऋषी कपूर म्हणाले - 'महिला केंद्रित चित्रपटांना मनापासून सपोर्ट करणारा मी एकुलता एक अभिनेता आहे' 

मी पुढारलेल्या विचारांचे चित्रपट नेहमी केले आहेत - ऋषी कपूर 

Sep 04,2019 11:22:00 AM IST

बॉलिवूड डेस्क : ऋषी कपूर आजारपणामुळे अनेक दिवसांपासून अमेरिकेत आहेत. आज (4 सप्टेंबरला ) त्यांचा 67 वा वाढदिवस आहे आणि चर्चा आहे की, ते लवकरच मुंबई येथील आपल्या घरी परंतु शकतात. अशातच त्यांच्याशी झालेल्या एका बातचितीतील काही खास मुद्दे आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथे सादर करत आहोत.

मी एकुलता एक अभिनेता काही, ज्याने महिला केंद्रित चित्रपटांना मनापासून सपोर्ट करत त्यामध्ये काम केले आहे. 'बॉबी' पासून ते 'प्रेमरोग', 'दामिनी', 'चांदनी', 'तवायफ' आणि 'नगीना' पर्यंत... मी असे अनेक चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये माझ्या पुरूष भूमिका महिला भूमिकांच्या सपोर्टमध्ये उभ्या राहिलेल्या दिसतात. दुसरीकडे 'एक चादर मैली सी' आणि 'दूसरा आदमी' (1977) यांसारखे चित्रपटही केले.

'एक चादर मैली सी' मध्ये हेमाजी यांचे पात्र रानो खूप पॉवरफुल होते. आपल्या दारुड्या नवऱ्याच्या (कुलभूषण खरबंदा) मृत्युनंतर रानोला पाल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेला दिर मंगल (ऋषि कपूर) याच्याशी लग्न करावे लागते. ज्याला त्यांनी लहान मुलाप्रमाणे वाढवले आहे.

यश चोप्रा निर्मित आणि रमेश तलवार दिग्दर्शित 'दूसरा आदमी', सत्तरच्या दशकातील खूप पुढारलेल्या विचारांचा चित्रपट होता. त्यामध्ये राखीजींची भूमिका खूप छान होती. चित्रपटाचा विषयही खूप नवीन होता.... एक कामकाज करणारी स्त्री विरुद्ध एक विवाहित गृहिणी. विवाहित गृहिणीचा रोल नीतू सिंहने केला होता.

मी पुढारलेल्या विचारांचे चित्रपट नेहमी केले आहेत. सोबतच हेदेखील तुम्ही नोटिस करू शकता की, हीरोइनच्या चित्रपटात ऋषी कपूर केवळ उभाच दिसला नाही. तर प्रत्येक चित्रपटात हीरोइनच्या बरोबरीचे वजनदार रोलदेखील केले. सांगा आणखी कोणता असा हीरो आहे, ज्याने पूर्ण महिला-मंडळासाठी चित्रपट केले असतील.

आलिया भट्‌ट आणि वरुण धवन यांच्यासोबत सलमान खानचा छोटा भाऊ अरबाज खानसह अनेक न्यूकमर्स माझ्यासोबत इंट्रोड्यूस झाले आहेत. ज्याला तुम्ही योगायोग म्हणा किंवा आणखी काही. मी योगायोगाने सर्वांसोबत उभा दिसतो.

जर तुम्ही माझी ऑटोबायोग्राफी पाहिली तर त्यामध्ये मी प्रत्येक डायरेक्टर, म्यूझिक-डायरेक्टर आणि प्रत्येक हीरोइनचे आभार मानले आहेत. मी सर्वांसाठी म्हणले आहे की, तुम्ही ते लोक आहात, ज्यांनी माझे करिअर बनवले. मी हेदेखील माझ्या मनाला म्हणले आहे की, तुम्ही नसता तर मी नसतो."

X