आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : बोल्ड ड्रेसमुळे या अॅक्ट्रेसला मागावी लागली होती माफी, क्रिकेटरबरोबर जोडले होते नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: दाक्षिणात्य चित्रपटांतील अॅक्ट्रेस श्रिया सरण आज 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रियाने बॉलिवूडच्या काही मोजक्याच चित्रपटांत काम केले आहे. पण दक्षिणेत तिचे नाव आघाडीच्या अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. तिला सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'शिवाजी' या चित्रपटाद्वारे ओळख मिळाली. श्रियाचे नाव वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोबरोबरही चर्चेत आले होते. ती ब्राव्होला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. पण तिने या अफवा फेटाळल्या होत्या. मी सिंगल आहे आणि आनंदी आहे, असे ती म्हणाली होती.


टॉपलेस फोटोशूटने आली होती चर्चेत.. 
चित्रपटांशिवाय अनेक ब्रँड्ससाठी काम करणारी श्रिया एका मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट केल्यानेही चर्चेत आली होती. पण जेव्हा मॅगझिन बाजारात आले तेव्हा ती म्हणाली होती, की तिच्या फोटोबरोबर छेडछाड करून तो तयार करण्यात आला आहे. पण फोटोत मात्र ती स्पष्टपणे दिसत होती. तिने 2011 मध्ये मुंबईत एक स्पा सुरू केला आहे, त्याचे नाव श्री स्पा आहे.

 

बालपणापासून डान्सची आवड
- देहराडूनमध्ये जन्म झालेल्या श्रियाचे बालपण हरिद्वारमध्ये गेले आहे. लहानपणापासून तिला डान्सची आवड होती. तिला डान्समध्येच करिअर करायचे होते, पण अचानक ती चित्रपटात आली. 

- डान्सर बनण्याची इच्छा असलेल्या श्रियाला एकदिवस एका गाण्याच्या व्हिडीओत कामाची संधी मिळाली. त्याचे शुटिंग वाराणसीत करण्यात आले. तो व्हिडीओ पाहून रामोजी फिल्म्सने तिला 'इष्टम' चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. पण हा चित्रपट रिलीज होण्याआधीच श्रियाने 4-5 चित्रपट साईन केले होते. 
- दक्षिणेत श्रियाला ओळख मिळाली ती रजनीकांत यांच्या 'शिवाजी' (2007) चित्रपटाने. या चित्रपटाच्या सिलव्हर ज्युबली कार्यक्रमात तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम करुणानिधी यांनाही बोलावण्यात आले होते. त्या कार्यक्रमात श्रिया शॉट डीप नेकचा व्हाइट कलरचा ड्रेस परिधान करुन पोहोचली. त्यावेळी चांगलाच गोंधळ झाला होता. 
- बोल्ड ड्रेसचा हा प्रकार एवढा, वाढला की श्रियाला माफी मागावी लागली होती. या चित्रपटात तिने तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या हिरोबरोबर म्हणजे रजनीकांत यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केले होते. 
- 2003 मध्ये तिने 'तुझे मेरी कसम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यात तिची लहानशी भूमिका होती. त्यानंतर ती 'थोडा तुम बदलो थोडा हम' (2004) चित्रपटात झलकली. त्याचवर्षी 'शुक्रिया' चित्रपटातही ती दिसली. 


पुढील स्लाइडवर वाचा श्रेया सरनविषयी...
 

बातम्या आणखी आहेत...