Home | Sports | From The Field | Birthday special story about Jasprit Bumrah

HBD : बुम..बुम..बुमराहच्या अचूक यॉर्करचे श्रेय जाते त्याच्या आईला, वाचा खास स्टोरी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 11:02 AM IST

जगातील बेस्ट डेथ ओव्हर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराहची यॉर्कर स्पेशालिस्ट बनण्याची स्टोरी आहे खास.

 • Birthday special story about Jasprit Bumrah

  स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि जगातील बेस्ट डेथ ओव्हर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह 6 डिसेंबरला वाढदिवस साजरा करतोय. बुमराहचा जन्म 1993 मध्ये गुजरातच्या एका पंजाबी कुटुंबात झाला होता.


  लहान असताना वडिलांचा मृत्यू
  - जसप्रित बुमराह 7 वर्षांचा होता, तेव्हाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर आई दलजीत कौरने त्याची काळजी घेतली. त्याचे वडील जसबीर सिंह रासायनिक कारखान्यात काम करत होते. तर आई शाळेत प्रिन्सिपल आहे.
  - भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर होण्याचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. वडिलांच्या मृत्यूनंतर आईनेच बुमराह आणि त्याचे मोठी बहिण जहिका यांचे संगोपन केले.


  आईमुळेच असा बनला यॉर्कर स्पेशलिस्ट
  - बुमराहच्या आई दलजीत कौर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की बुमराह लहानपणापासूनच क्रिकेटवेडा आहे. भर दुपारीही तो बॉलिंग प्रॅक्टिस करायचा. त्याच्या आवाजाने कंटाळून मी मी त्याला सांगितले होते, की चेंडू असा फेक की भिंतीला लागून आवाज होणार नाही.
  - यानंतर त्याने बॉल भिंत आणि जमीनीच्या कोपऱ्याला लागेल असा फेकण्यास सुरुवात केली. मला कल्पनाही नव्हती की असे केल्याने तो यॉर्कर स्पेशलिस्ट होईल.
  - 14 वर्षांचा असताना बुमराहने आईला सांगितले होते, आपण क्रिकेटर होणार. लहान असताना क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकालाच आपण क्रिकेटर होऊन असे वाटते. पण, तसे प्रत्यक्षात उतरवणे काही सोपे नाही. तरीही बुमराहने आपण केलेला दावा आणि स्वप्न दोन्ही साकारले आहेत.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, बुमराहच्या फॅमिलीचे आणखी काही फोटोज...

 • Birthday special story about Jasprit Bumrah
 • Birthday special story about Jasprit Bumrah
 • Birthday special story about Jasprit Bumrah
 • Birthday special story about Jasprit Bumrah
 • Birthday special story about Jasprit Bumrah

Trending