Home | Gossip | Birthday Special Story of Actress Prachi Desai

B'day: 12 वीत असताना केला होता टीव्हीवर डेब्यू, पुण्यातून झाले आहे शिक्षण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 12, 2018, 12:00 AM IST

प्राची देसाई आज 29वा वाढदिवस साजरा करत आहे. प्राचीने 17 व्या वर्षी (12वीमध्ये असताना) टीव्हीवर करिअर सुरू केले होते.

 • Birthday Special Story of Actress Prachi Desai

  मुंबई - प्राची देसाई आज 29वा वाढदिवस साजरा करत आहे. प्राचीने 17 व्या वर्षी (12वीमध्ये असताना) टीव्हीवर करिअर सुरू केले होते. प्राचीने तिच्या टीव्ही करिअरची सुरुवात 2006 मध्ये एकता कपूरच्या कसमसे द्वारे केली. त्याच शोमुळे प्राची घराघरात बानी वालिया नावाने ओळखली जाऊ लागली. टीव्हीवर यशाची चव चाखल्यानंतर प्राचीने बॉलिवूडमध्ये नवी इनिंग सुरू केली. तिने ‘रॉक ऑन’ चित्रपटातून डेब्यू केला. तिचा दुसरा चित्रपट 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' ला जोरदार यश मिळाले. चित्रपट क्षेत्रातील पार्श्वभूमी नसतानाही तिने स्वबळावर स्थान निर्माण केले आहे.

  पाचगणी, पुण्यात झाले शिक्षण
  12 सप्टेंबर 1988 रोजी गुजरातमध्ये जन्मलेल्या प्राचीने पाचगणी येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमधून शिक्षम पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील सिंहगड कॉलेजमधून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिला मॉडेलिंग क्षेत्रात नशीब आजमावण्याची संधी मिळाली.

  अशी मिळाली मालिका
  शिक्षण सुरू असताना बालाजी टेलिफिल्म्स आपल्या नवीन मालिकेसाठी नवीन चेह-याच्या शोधात होते. याच काळात पुण्यात ऑडीशन्स घेणा-या बालजी टेलिफिल्म्सकडे प्राचीने स्वतःची काही छायाचित्रे पाठवली होती. ही छायाचित्रे पाहून तिला स्क्रिन टेस्टसाठी बोलावण्यात आले आणि येथेच तिची मालिकेसाठी निवड झाली. हा प्राचीच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सविस्तर...

 • Birthday Special Story of Actress Prachi Desai

  'कसम से'मुळे मिळाली लोकप्रियता...


  बालाजी टेलिफिल्म्सच्या 'कसम से' या मालिकेमुळे प्राची घराघरांत पोहोचली. तीन बहिणींवर आधारित या मालिकेत प्राचीने बानी हे पात्र साकारले होते. या मालिकेत तिचा को-स्टार राम कपूर होता. 2006 पासून 2009पर्यंत झी टीव्हीवर प्रसारित होणा-या या शोमध्ये प्राचीने बानी नावाचे पात्र साकारले होते. सांगितले जाते, की भूमिकेत झोकून देण्यासाठी एकताने तिला सर्व अभिनयाच्या टिप्स दिल्या होत्या.

   

 • Birthday Special Story of Actress Prachi Desai

  'रॉक ऑन'द्वारे बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री..


  एकता कपूरच्या मालिकेनंतर प्राचीने 2008 मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात फरहान अख्तरच्या 'रॉक ऑन' या म्युझिकल सिनेमाद्वारे केली. हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि त्यानंतर प्राचीने कधीही मागे वळून पाहिले नाही. या सिनेमात प्राचीने फरहानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यानंतर प्राची 'लाइफ पार्टनर' या सिनेमात झळकली, मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला होता.

   

 • Birthday Special Story of Actress Prachi Desai

  या सिनेमांमध्ये झळकली आहे..


  2008मध्ये प्राचीने मोठ्या पडद्यावर पहिले पाऊल ठेवले. अभिषेक कपूरच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'रॉक ऑन'मधून तिने मोठ्या पडद्यावर ओळख मिळवली. फरहान अख्तरने हा सिनेमा निर्मित करून मुख्य भूमिकाही साकारली होती. त्यानंतर 'लाइफ पार्टनर' (2009) 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' (2010), 'तेरी मेरी कहानी' (2012), 'बोल बच्चन' (2012), 'आय, मी और मै' (2013) आणि 'पुलिसगिरी' (2013) या सिनेमांमध्ये काम करून ती चांगलीच प्रसिध्दीस आली.
   
   

 • Birthday Special Story of Actress Prachi Desai
 • Birthday Special Story of Actress Prachi Desai

Trending