आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Special : When Karisma Kapoor Was Started Rejecting Films Apposite To Akshay Kumar, She Was Afraid For Career

Birthday Special : जेव्हा अक्षय कुमारचे नाव ऐकताच करिश्मा कपूर नाकारायची चित्रपटांच्या ऑफर्स, करिअरच्याबाबतीत वाटत होती भीती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : करिश्मा कपूर 45 वर्षांची झाली आहे. 25 जून 1974 ला मुंबईमध्ये जन्मलेल्या करिश्माने 1991 मध्ये 'प्रेम कैदी'ने बॉलिवूड डेब्यू केला होता, ज्यामध्ये तिचा हीरो हरीश कुमार होता. त्यानंतर तिने सुनील शेट्टी, अजय देवगण, सलमान खान, गोविंदा आणि अक्षय कुमार यांसारख्या स्टार्ससोबत अनेक हिट चित्रपट दिले. अक्षय कुमारने तर पहिलाच चित्रपट 'दीदार' करिश्मा कपूरच्या अपोजिट साइन केला होता, जो 1992 मध्ये रिलीज झाला होता. पण एक वेळ अशीही आली जेव्हा करिश्मा अक्षयचे नाव ऐकताच चित्रपटाला नकार द्यायची.  

 

करिश्माच्या मनात बसली होती असुरक्षिततेची भीती... 
जसजसे करिश्मा चित्रपट करत होती, तिची लोकप्रियता वाढत चालली होती. तसेच तिच्या मनात असुरक्षिततेची भीतीही बसत चालली होती. विशेषतः अक्षय कुमारसोबतच तिचा सुरुवातीचा प्रवास चांगला नव्हता. 'दीदार' चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉप झाला. तरीही 'सपूत' आणि 'मैदान-ए-जंग' देखील चालला नाही. 

 

हे 90 चे दशक होते, जेव्हा अक्षयचे डजनभर चित्रपट फ्लॉप झाले होते. यामध्ये 'लहू के दो रंग' (1997) देखील सामील होती. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट फ्लॉप होताच करिश्मा याबद्दल साशंक होती की, तिने अक्षयसोबत आणखी चित्रपट केले पाहिजे की, नाही ?

 

अक्षयचे नाव ऐकताच चित्रपटपासून मागे झाली... 
करिश्मा कपूर वैयक्तिकपणे अक्षय कुमारची चांगली मैत्री होती. पण प्रोफेशनली तिला कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती. ती खूपच सावधानीने करिअरमध्ये पुढचे पाऊल टाकत होती. तनुजा चंद्राने 'संघर्ष' (1999) ऑफर केली. तिला स्क्रिप्ट खूप आवडली आणि ती चित्रपट करण्यासाठी तयारदेखील होती. पण जसे तिला कळाले की, मेकर्स अक्षयला चित्रपटात साइन करण्याचे प्लॅनिंग करत आहेत तर ती संभ्रमात पडली. तिच्या आसपासच्या लोकांनी तिला भडकवले आणि अखेर तिने चित्रपट नाकारला. नंतर हा रोल प्रीती झिंटाला मिळाला.  

 

प्रियदर्शनचा चित्रपटदेखील नाकारला... 
रिपोर्टमध्ये प्रियदर्शनचा हेरा फेरी (2000) बद्दलही एक किस्सा आहे. सांगितले गेले आहे की, करिश्मा प्रियदर्शन सारख्या उत्तम डायरेक्टर्ससोबत काम करू इच्छित होती. प्रियदर्शननुसार, स्वतः करिश्माने अशी इच्छा व्यक्त केली होती की, तिला त्यांच्यासोबत कमीत कमी एक चित्रपट तरी करायचा आहे. त्यावेळी करिश्मा मोठी स्टार होती. त्यामुळे प्रियदर्शन तिच्यासाठी एखाद्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटाची वाट पाहत होते. जेणेकरून करिश्माच्या स्टेटससोबत न्याय होऊ शकेल. 

 

याचदरम्यान त्यांच्याकडे 'हेरा फेरी' चित्रपट आला आणि त्यांनी यासाठी करिश्माला अप्रोच केले. यासाठी करिष्मा खूप एक्सायटेड होती पण जसे कळाले की, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी तिचे सहकलाकार असतील तिने चित्रपट सोडला. प्रियदर्शन यांच्यानुसार, करिश्माने वैयक्तिक कारण देत चित्रपटातून हात काढून घेतला. नंतर यासाठी त्यांनी तब्बूला कास्ट केले. 

 

बंद झाल्या होत्या अक्षयसोबत चित्रपटांच्या ऑफर... 
सांगितले जाते की, करिश्माची इच्छा समजून घेऊन मेकर्सने तिला अक्षय कुमारच्या अपोजिट चित्रपट ऑफर करणे बंद केले होते. 1999 मध्ये रिलीज झालेला 'जानवर' पर्यंत अक्षय आणि करिश्माने कोणत्याच चित्रपटात एकत्र काम केले नाही. सलग अनेक फ्लॉप चित्रपटानंतर अक्षयला 'जानवर' चित्रपटाच्या स्वरूपात एक हिट चित्रपट मिळाला होता. 

 

डायरेक्टर सुनील दर्शनने 'जानवर' नंतर आपला चित्रपट 'एक रिश्ता : द बॉन्ड ऑफ लव्ह' साठी या हिट जोडीला पुन्हा कास्ट केले. हा चित्रपटही बॉक्सऑफिस वर हिट झाला आणि करिश्माला वाटले की, अक्षय आता फ्लॉप स्टारच्या टॅगमधून बाहेर आला आहे. पण आता स्वतः करिश्माचिंच व्हॅल्यू ती राहिली नव्हती जशी 90 दशकात होती. परिणामी अक्षयसोबतचे तिचे दोन चित्रपट 'हां मैंने भी प्यार किया है' आणि 'मेरे जीवन साथी' हे चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉप झाले. 

बातम्या आणखी आहेत...