आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मदिवस : या चित्रपटामुळे कंगाल झाले होते सुनील दत्त, बसमध्ये प्रवास करत खात होते धक्के; लोक मारत होते टोमणे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - आज अभिनेता आणि राजकारणी दिवंगत सुनील दत्त यांची 90 वा जन्मदिवस. 6 जून 1929 रोजी पाकिस्तानच्या दीना येथे त्यांचा जन्म झाला. सुनील दत्त अभिनेत्यासोबत एक दिग्दर्शक आणि निर्माते सुद्धा होते. त्यांनी आपले बॅनर अजंता आर्ट्स अंतर्गत तले यांदे (1964), मन का मीत (1968) आणि रेश्मा और शेरा (1971) आदी चित्रपट बनवले. पण रेशमा और शेराने सुनील दत्त यांना कंगला केले होते. या चित्रपटामुळे त्यांची अतिशय बिकट परिस्थिती झाली होती. त्यांना बसमधून धक्के खात प्रवास करावा लागला होता. लोक त्यांनी टोमणे मारत होते. पण या चित्रपटाला उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट संगीत आणि उत्कृष्ट छायाचित्रण या तीन प्रकारात राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.  


सुनील दत्तवर झाले होते 60 लाखांचे कर्ज

> सुनील दत्त यांनी चित्रपटाची घोषणा केली असता चित्रपटाचे चित्रकरण 15 दिवसांच्या आत राजस्थानमध्ये करण्याची घोषणा केली. एस. सुखदेव हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते तर सुनील दत्त -वहिदा रहमान मुख्य भूमिकेत होते. सोबतच विनोद खन्ना, राखी गुलजा आणि अमिताभ बच्चन यांच्या देखील महत्वाच्या भूमिका होत्या. मुख्य कलाकारांसह फिल्मची युनिटच्या सर्व 100 जण जैसलमेरजवळील पोचिना गावात राहिले. 

 

> अर्धाअधिक चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. पण या दरम्यान सुनील दत्त यांनी चित्रीकरण पाहिले असता ते त्यांना आवडले नाही. यानंतर त्यांनी एस. सुखदेव यांनी बाजूला सारून दिग्दर्शनाची धुरा स्वतःच्या हातात घेतली आणि संपूर्ण चित्रपटाचे पुन्हा चित्रण करण्यात आले. 15 दिवसांत चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करायचे होते. पण यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला. 

 
> सुनील दत्त यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'चित्रपट पूर्ण होईपर्यंत माझ्यावर 60 लाख रुपयांचे कर्ज झाले होते. याशिवाय मी पाच चित्रपटांना नकार दिला होता' 
 

 
लोकांनी सुनील दत्त यांना टोमणे मारण्यास केली होती सुरूवात  

- चित्रपट अयशस्वी झाल्यानंतर लोक सुनीत दत्त यांच्याकडे आपले पैसे मागण्यासाठी येत होते. एकदा सुनील दत्त यांनी सांगितले होते की, 'मी 42 वर्षांचा झालो होतो आणि तीन मुलांचा पिता होतो. माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते. माझ्याकडील 7 पैकी 6 गाड्या विकल्या होत्या. माझ्याकडे फक्त एक गाडी शिल्लक होती. मुलींना शाळेत ने-आण करण्यासाठी तिचा उपयोग होत होता. माझे घर देखील गहाण ठेवले होते. मी बसने ये-जा करणे सुरु केले. तेव्हा लोक मला टोपणे मारत म्हणायचे - काय सुनील दत्त, तु सर्वकाही संपले? आता बसने प्रवास करतोयस? या वाईट प्रसंगी घरातील नरगिसचे प्रीव्ह्यू थिएटरची खूप मदत झाली. नरगीसने काही महिन्यांपूर्वीच तो तयार केला होता. यामध्ये फिल्ममेकर्सना त्यांच्या चित्रपटाच्या प्रीव्ह्यू आणि डबिंगसाठी बोलवले जात होते.'

 

दोन वर्षानंतर सुधारली सुनील दत्त यांची परिस्थिती

- सुनील दत्तसाठी दोन वर्ष खूप हलाखीचे होते. पण यानंतर पुन्हा एकदा त्यांचे नशीब चमकले. त्यांनी हीरा (1973), गीता मेरा नाम(1974), प्राण जाए पर वजन न जाए(1974) आणि नहले पर दहला(1976) यासांरख्या चित्रपटांत काम केले. आणि हे चित्रपट बॉक्सऑफिसवर हिट ठरले.


 

बातम्या आणखी आहेत...