आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Wishes| Bolllywood Celebs Took Social Media To Wish PM Modi Happy 69th Birthday

बॉलीवूड कलाकारांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले - तुम्ही अशाचप्रकारे देशाची सेवा करत रहा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 69 वाढदिवस आहे. यानिमित्ताने विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशात बॉलीवूडर कसे मागे राहतील.  अनेक बॉलीवूड कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये सनी देओल, दलेर मेहंदी, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. 


बॉलीवूडकरांनी ट्वीटरद्वारे पंतप्रधानांना दिल्या शुभेच्
छा 

सनी देओल
सनी देओलने लिहिले की, 'नरेंद्र मोदीजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही अशाचप्रकारे पूर्ण उत्साहाने देशाची सेवा करत रहा. आपले समर्पण, वचनबद्धता आणि नवीन भारत बनविण्याचा विचार आम्हाला नेहमी प्रेरणा देईल. मी तुमच्या दीर्घ आयुष्य आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.'

गायक दलेर मेहंदीने लिहिले की, 'पंतप्रधान मोदीजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. परमात्मा तुम्हाला दीर्घायुष्य देवो. तुमचाच दलेर मेहंदी.'

अनिल कपूरने लिहिले की, 'नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या देशाला सर्वोत्कृष्ट बनविण्याच्या प्रयत्नांसह आणखी एक वर्ष आपल्या प्रतीक्षेत आहे.'

अनुपम खेर यांनी ट्वीटर शुभेच्छा देत लिहिले की, 'पंतप्रधानजी, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही सर्व तुमच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो.'

विवेक ओबेरॉयने पोस्ट केला व्हिडिओ
पीएम नरेंद्र मोदी चित्रपटात त्यांची भूमिका साकारणाऱ्या विवेक ओबेरॉयने व्हिडिओ पोस्ट केला. विवेकने मेसेजमध्ये लिहिले की, 'आमच्या लाडक्या पंतप्रधानांना एका अभिमानी भारतीयाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.'