आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bitcoin Ban Lifted: Supreme Court Lifts Ban On Bitcoins And Cryptocurrency Imposed By RBI In India

भारतात बिटकॉइनवरील बंदी उठली! भारतीय रिझर्व्ह बँकेने लावलेला बॅन सुप्रीम कोर्टाने हटवला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने बुधवारी आदेश देत भारतामध्ये क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांना परवानगी दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने देशात क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांवर बंदी आणली होती. त्याविरोधात इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाने (आयएमएआय) आक्षेप नोंदवत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याच याचिकेवर बुधवारी सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने ही बंदी उठवण्याचे आदेश दिले आहेत. आरबीआयने लावलेल्या बंदीमुळे देशभर बिटकॉइनसारख्या क्रिप्टो करन्सी व्यवहारांना लगाम बसला होता. परंतु, यामुळे क्रिप्टो करन्सीच्या बदल्यात होणारे वैध व्यवहार सुद्धा कोलमडले असा युक्तीवाद आयएमएआयने कोर्टात मांडला.

क्रिप्टो करन्सी चलन नाही, मग आरबीआयला बंदीचा अधिकार कसा -आयएमएआय

जस्टिस आर. नरिमन, अनिरुद्ध बोस आणि व्ही. रामसुब्रह्मण्यम यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला. कोर्टात आपली बाजू मांडताना आयएमएआयच्या वकिलांनी सांगितले, की "मुळात क्रिप्टो करन्सी हे चलनच नाही. ती एक वस्तू आहे. अशात आरबीआयला त्यावर बंदी लावण्याचे अधिकार नाहीत. आरबीआयने क्रिप्टो करन्सीवर बंदी लावावी असा कायदा सुद्धा नाही.

आरबीआयने नेहमीच दिला बिटकॉइनपासून सावध राहण्याचा सल्ला

2013 पासूनच आरबीआय देशवासियांना त्याच्या वापरावर सतर्क राहण्याचे सल्ले देत आहे. त्याचा आर्थिक व्यवहारांवर वाइट परिणाम होऊ नये अशी आरबीआयची भूमिका होती. सोबतच, आपल्याला क्रिप्टो करन्सीवर निर्बंध लादण्याचे अधिकार आहेत असेही आरबीआयने म्हटले होते. यानंतर 2018 मध्ये आरबीआयने देशात क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांवर बंदी लावली. त्यानुसार, क्रिप्टो करन्सीचे व्यवहार करण्याची कुठल्याही वित्तीय संस्थेला परवानगी नव्हती. सोबतच, सर्व बँका आणि वित्तीय संस्थांना क्रिप्टो करन्सीचे व्यवहार गुंडाळण्यासाठी 3 महिन्यांची मुदत दिली होती.

क्रिप्टो करन्सी म्हणजे काय?

क्रिप्टो करन्सी हे एक आभासी आणि डिजिटल स्वरुपातील चलन आहे. यासाठी कुठल्याही बँकेकडे व्यवहार करण्याची गरज नसते.हा व्यवहार बहुतांशी खासगी स्वरुपात सुरू असतो. क्रिप्टो करन्सीचे सर्वात प्रसिद्ध चलन बिटकाइन आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या चलनाची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. एका बिटकाइनची किंमत बाजारात कमाल 10 हजार अमेरिकन डॉलर (7.30 लाख रुपये) पर्यंत पोहोचली आहे. बिटकॉइनसारखाच फायदा इथेरियम आणि रिपल्स एक्सआरपी या क्रिप्टोकरन्सीच्या इतर प्रकारांना सुद्धा झाला आहे. गेल्या 11 वर्षांपासून क्रिप्टो करन्सीचे व्यवहार सुरू आहेत. 2017 मध्ये तर एक बिटकॉइनची किंमत 20 हजार अमेरिकन डॉलरपर्यंत पोहचली होती. तरीही अनेक देशांमध्ये या चलनाच्या व्यवहारावर निर्बंध आहेत. 2017 मध्ये जपानने या डिजिटल चलनाला अधिकृत परवानगी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...