आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bitdance Days Changed Because Of Tiktok; In The Last Six Months, Revenue Of Rs 50 Thousand Crore

टिकटॉकमुळे बाइटडान्सचे दिवस बदलले; गेल्या सहा महिन्यांत ५० हजार कोटी रुपयांचा महसूल जमवला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - टिकटाॅक हा देशातील व्हिडिआे स्ट्रिमिंग अॅप देशभरात वेगाने लाेकप्रिय झाला आहेे. आता या लाेकप्रियतेच्या मदतीने टिकटाॅक आपल्या बाइटडान्स या पालक कंपनीची दुरवस्था दूर करत आहे. 
 
बाइटडान्सने २०१९ च्या पहिल्या सहामाहीत ७०० ते ८४० काेटी डाॅलरचा (५० ते ६० हजार काेटी रुपये वा ५ ते ६ हजार काेटी युआन) महसूल मिळवला आहे. राॅयटर्सच्यानुसार कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहेे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, दुसऱ्या सहामाहीत नफा हाेण्याची बाइटडान्सला आशा आहे. कंपनीने पूर्ण वर्षासाठी १० हजार काेटी युआनचे लक्ष्य निश्चित केले हाेते. परंतु पहिल्या तिमाहीतील चांगल्या कामगिरीनंतर आता हे लक्ष्य वाढवून १२ हजार काेटी युआन केले आहे. द इन्फर्मेशन या आॅनलाइन टेक न्यूज आऊटलेटच्या मते २०१८ च्या पूर्ण वर्षामध्ये बाइटडान्सला ७२० काेटी डाॅलरचा (जवळपास ५१ हजार काेटी रुपये) महसूल मिळाला हाेता. त्यानुसार कंपनीने या वर्षाच्या पहिल्या सहामाहीतच मागील संपूर्ण वर्षातील महसुलाशी बराेबरी साध्य केली आहे. बाइटडान्सने यावर आतापर्यंत काेणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. बाइटडान्स हा वर्षभरापूर्वी सुरू झालेला स्टार्टअप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या वर्षी कंपनीचे मूल्य ७८०० काेटी डाॅलर (जवळपास ५.५ लाख काेटी रु.) हाेते. कंपनीकडे जिनरी टाॅटिनाे (आजची हेडलाइन) o टिकटाॅकचे ‘डाऊयिन’ चीन व्हर्जनही आहे. कंपनीला बहुतांश महसूल चीनमधून मिळताे. चीनमध्ये डाऊयिनला जाहिरात शुल्काद्वारे महसूल मिळताे तर टिकटाॅक सध्या पैसे कमावण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. 

बाइटडान्सचे जगभरात ५० हजार कर्मचारी
चीनमधील अन्य टेक कंपन्यांसाठी बाइटडान्सचे माेठे आव्हान असल्याचे मानले जाते. यामध्ये साेशल मीडिया आणि गेमिंगमधील आघाडीची टेनसेंट हाेल्डिंग्ज व बायडू सर्च इंजिन कंपनीचा समावेश आहे. बाइटडान्सचे सर्व अॅप मिळून जगभरात १५० मासिक सक्रिय युजर आहेत. दरराेजच्या सक्रिय युजर्सची संख्या ७० काेटी आहे. गेल्या वर्षी बाईट डान्सने एक सर्च इंजिन लाँच केले आहे. त्याचबराेबर चिनी भाषेची विकीपीडिया म्हणून आेळखल्या जाणाऱ्या ‘बायकी.काॅम’ वेबसाइटचे अधिग्रहणही केले आहे. कंपनी आता पेड म्युझिक अॅप आणण्याच्या याेजनेवर काम करत आहे. या आक्रमक रणनीतीनुसार बाइटडान्सच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वेगाने वाढ हाेत आहे. कंपनीकडे सध्या एकूण ५० हजार कर्मचारी आहेत. गेल्या वर्षी ही संख्या ४० हजार हाेती.