आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान होण्यासाठी मोदींना हव्यात 200 जागा; मिशन 272+ कसे होणार पूर्ण?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नरेंद्र मोदींनी बुधवारपासून आपला आक्रमक निवडणूक प्रचार सुरू केला. ते 295 मतदारसंघांत जाऊन 185 रॅलींना संबोधित करतील. गुजरातमधून निघून केंद्राच्या सत्तेपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. मोदींनी सत्तेसाठी 272 जागा जिंकण्याचे मिशन बनवले आहे. मात्र पहिला टप्पा आहे भाजपला किमान 200 जागा मिळवून देण्याचा. 200 जागा यासाठी की, त्यानंतर बहुतेक नव्या साथीदारांना एनडीएत आणणे अवघड नसेल. अशा वेळी मिशन 272+ साठी मोदींचे गणित काय? आणि मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसची व्यूहरचना काय असेल.

मिशन 272+ शक्य आहे की नाही ?
543 जागा आहेत लोकसभेच्या. 450 जागांवर लढणार भाजप. 300 अशा जागा जिथे कधी ना कधी पक्ष झाला विजयी.

यामागे भाजपाचे २ निकष
1. सध्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, दिल्लीच्या एकूण 590 जागांपैकी भाजपने 412 जागा जिंकल्या आहेत. म्हणजे 69 % यश.
2. लोकसभेत भाजपला 450 पैकी 326 जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. म्हणजे 72 टक्के. मात्र सर्व राज्यांमधील प्रभाव या चार राज्यांसारखा नाही. त्यामुळे 72 टक्क्याला 44 टक्के मानले तरी, 200 जागा होतात. 450 मधून 200 म्हणजे 44 टक्के.

काँग्रेस कशी करणारा मोदींना विरोध ?
पंचसूत्री रणनीती

1 - भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांविरोधात बडे नेते रिंगणात उतरवून.
2 - जातीयवादी प्रतिमा आणि गुजरातमध्ये खोट्या विकासाच्या नावावर मोदींवर दोन्ही बाजूंनी हल्ला चढवून.
3 - येडियुरप्पा, श्रीरामुलुंच्या निमित्ताने मोदींना भ्रष्टाचाराच्या मुद्यावर घेरून. लोकपाल आणण्याचे र्शेय घेऊन.
4 - अटलबिहारी सरकारची सहा वर्षे विरुद्ध यूपीएची दहा वर्षांच्या सरकारची आक्रमकपणे तुलना करून.
5 - भाजपात ज्येष्ठ नेत्यांचा अपमान आणि मोदींच्या हुकूमशाही प्रतिमेवर हल्ला.

पुढील स्लाईडमध्ये वाचा मोदींचे संभाव्य गणित