आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप महीला आघाडीचे तीव्र निदर्शने, आमदार विद्या चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • भाजप महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली

बीड- सध्या राज्यात हिंगणघाट महिला जळीत कांडापासून महिला अत्याचाराचे सत्रच सुरु झाल्याने महिलांमध्ये असुरक्षततेची भीती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आमदार विद्या चव्हाण यांनी आपल्या सुनेला अमानुष वागणूक देऊन तिचा छळ करून तिच्या कुटुंबीयांना त्रास दिला या अन्यायाच्या विरोधात तक्रार नोंदवला. तरीदेखील कठोर कारवाई करण्यात आलेली नाही, उलट चव्हाण या सुनेच्या विरोधात अभद्र आरोप केलेले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आज बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध करून निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांना लेखी निवेदन दिले आहे. भाजपा महिला आघाडीच्या संतप्त महिला कार्यकर्त्यांनी आज दुपारी आ. विद्या चव्हाण यांची प्रतिकात्मक शवयात्रा काढली, त्या शवाला चपलांचा हार घालून त्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून महिला अत्याचाराविरोधात आक्रोश व्यक्त केला. महिलांच्या घोषणाबाजी मुळे ज़िल्हा अधिकारी कचेरी समोरील परिसर दणाणून गेला. या आंदोलनात महिला आघाडीच्या अँड. संगिता धसे, शैलजा मुसळे, अनिता जाधव, लता राऊत, छाया मिसाळ, लता मस्के, संजीवनी राऊत, गंगुबाई कुडके , चंद्रकला लव्हाळे, रोहिणी जाधव, सुनीता वडमारे आणि पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. हे जग सुंदर बनवण्यात स्त्रियांचा वाटा मोलाचा आहे हा विचार जगाने स्वीकारला आपल्या चौफेर सुद्धा स्त्रियांना पुरुष समान दर्जा देण्याचा नुसता प्रयत्न नव्हे तर चळवळ चालू आहे स्त्रीमुक्तीची चळवळ महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजा राम मोहन राय यांनी या देशात रुजवली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात स्त्रीला पुरुष समान समानतेचा अधिकार बहाल केला. शाहु फुले आंबेडकरांचे तत्वज्ञान घेऊन महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवक्त्या आमदार विद्या चव्हाण यांनीच आपल्या सुनेवर अत्याचार करून तिला तिच्या हक्कापासून परावृत्त केले आहे. न्याय मागण्यासाठी पुढे आलेल्या सुनेच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करून समस्त महिला जातीचा अवमान केलेला आहे. व्यासपीठावरून स्त्री हक्काच्या गोष्टी सांगणारे स्त्रीमुक्तीचे तत्वज्ञान उघडणारे राष्ट्रवादीचे सर्व नेते मूग गिळून गप्प बसले आहेत अत्यंत खेदाची व संतापजनक बाब आहे. राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रिय असणाऱ्या एका महिला नेत्या कडूनच एका स्त्रीची कुचंबणा होणे तिच्यावर अन्याय होऊ नये, ही बाब सहनशीलतेच्या पलीकडे आहे आमदार विद्या चव्हाण यांच्या या कृत्यामुळे त्यांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनते समोर आलेला आहे. या घटनेची तक्रार पोलिसात नोंदवली गेली आहे, परंतु सरकारकडून याविषयी कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी व विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्या विद्या चव्हाण यांच्या आमदारकीचा राजीनामा घेण्यात यावा अशी आग्रही मागणी बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...