आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Truth vs Hype: मोदींचे मंत्री म्हणाले, भारत बंदमुळे बिहारमध्ये झाला मुलीचा मृत्यू; अवघ्या काही तासांतच समोर आले सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या किंमतींवर सरकार बॅकफुटवर आले आहे. तरीही काँग्रेस 21 पक्षांच्या समर्थनासह पुकारलेल्या भारत बंदवर टीका करण्याची संधी भाजपने सोडली नाही. भारत बंदमुळेच बिहारमध्ये एका मुलीचा मृत्यू झाला असा आरोप भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत केला. काँग्रेसने पुकारलेल्या बंदमुळे देशभर झालेल्या हिंसाचार आणि त्या चिमुकलीच्या मृत्यूवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी उत्तर द्यावे असेही प्रसाद म्हणाले. तेलाचे दर आंतरराष्‍ट्रीय बाजारात निश्चित होतात. सोबत सलग होणारी इंधन वाढ नियंत्रणात ठेवणे किंवा कमी करणे सरकारच्या हातात नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 


मुलीच्या मृत्यूवर राहुल गांधींना विचारला जाब
बिहारमध्ये भारत बंद दरम्यान झालेल्या एका मुलीच्या मृत्यूनंतर केंद्रीय मंत्री प्रसाद यांनी राहुल गांधींना जाब विचारला. ते म्हणाले, की 'बंद दरम्यान कधीच रुग्णवाहिका अडवली जात नाही. दोन वर्षांच्या मुलीच्या मृत्यूवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे. आम्ही त्रास सहन करणाऱ्या जनतेच्या पाठीशी आहोत.' एवढेच नव्हे, तर काँग्रेसने पुकारलेला देशव्यापी बंद अयशस्वी ठरला असेही रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले.

 
समोर आले मुलीच्या मृत्यूचे सत्य
बिहारच्या जहानाबादचे उपविभागीय जिल्हाधिकारी पारितोष कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, 'त्या मुलीचा मृत्यू भारत बंद किंवा ट्रॅफिक जॅममुळे झालेला नाही. त्या मुलीच्या कुटुंबियांनी तिला घरातून रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी विलंब केला. कुटुंबियांनी तिला उपचारासाठी आधीच रुग्णालयात नेले असते तर तिचा जीव वाचला असता.' 

बातम्या आणखी आहेत...