आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप व काँग्रेसने मध्य प्रदेशात 23%, राजस्थानात 24% जागांवर महिला उमेदवारांना तिकीट दिले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> राजस्थानात भाजपची २३, काँग्रेसची २६ महिलांना उमेदवारी 

> मध्य प्रदेशात भाजपच्या २५, काँग्रेसच्या २८ महिला उमेदवार

 

भोपाळ - विधानसभा निवडणुकीमध्ये प्रमुख पक्षांनी पुन्हा महिलांना तिकिटे कमी दिली. मध्य प्रदेशमध्ये भाजप व काँग्रेसने २३० पैकी ५३ म्हणजे २३% जागांवर महिलांना तिकीट दिले आहे. भाजपने २५ म्हणजे ११% व काँग्रेसने २८ म्हणजे १२% महिलांना उमेदवारी दिली. राज्यात या वेळी एकूण ३८५ महिला निवडणूक मैदानात आहेत. २०१३ मध्ये भाजपने २८ महिलांना तिकीट दिले होते. यामध्ये २२ म्हणजे ७८% आमदार झाल्या. काँग्रेसने २३ जणींना तिकीट दिले व ६ म्हणजे २६% जिंकल्या होत्या.  

 

राजस्थानात भाजप व काँग्रेसने केवळ ४९ म्हणजे २४% जागांवर महिलांना तिकीट दिले. राज्यात भाजपने २३ व काँग्रेसने २६ महिलांना तिकीट दिले आहे. या हिशेबाने भाजपने २०० जागांपैकी ११.५% व काँग्रेसने १३.५% महिला उभ्या केल्या आहेत. २०१३ विधानसभा निवडणुकीत भाजपने २६ महिलांना तिकीट दिले, २२ म्हणजे ८६% जिंकल्या. काँग्रेसने २४ महिलांना तिकीट दिले, एक म्हणजे ४% जिंकल्या.  

 

मध्य प्रदेश : शिवराज यांच्या ५ महिला मंत्र्यांपैकी दोघींचे तिकीट कापले  
शिवराज सरकारमध्ये ५ महिला मंत्री होत्या. यामध्ये दोन मंत्री माया सिंह व कुसुम महदेले यांचे या वेळी तिकीट कापले. भोपाळच्या गोविंदपुरा जागेवर माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांची सून कृष्णा, इंदूर-४ मधून मालिनी गौड, भोपळ उत्तरमधून मुस्लिम उमेदवार फातिमा, महूहून उषा ठाकूर, बुऱ्हाणपूरमधून मंत्री अर्चना सिटणीस, शिवपुरीहून मंत्री यशोधरा राजे शिंदे प्रमुख चेहरे आहेत.  

 

राजस्थान : राजघराण्यातील पुरुषांपेक्षा जास्त महिला निवडणूक मैदानात  
राजस्थानच्या निवडणुकीत राजघराण्यातील महिलांना पुरुषांपेक्षा जास्त तिकिटे मिळाली आहेत. भाजपकडून दोन पूर्वाश्रमीच्या राण्या, सीएम वसंुधरा राजे, कल्पना देवी व दोन पूर्वाश्रमीच्या राजकुमारी सिद्धी कुमारी, कृष्णेंद्र कौर दीपा कुमारी मैदानात आहेत. काँग्रेसकडून पूर्वाश्रमीचे राजे विश्वेंद्र सिंह मैदानात आहेत. २०१३ मध्ये राजघराण्यातील ५ महिलांनी निवडणूक जिंकली होती.  

 

महिलांबाबत कमलनाथ यांच्या वक्तव्यास भाजपने राज्यात बनवला निवडणूक मुद्दा  
महिलांना तिकीट देण्याबाबत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्य दिले आहे. नुकतेच त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले होते की, काँग्रेसमध्ये महिलांचा तिकीट कोटा व पेहराव्याच्या आधारे दिला नाही. भाजपने या वक्तव्यास निवडणूक मुद्दा ठरवले आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस महिलांना सजावटीचे सामान म्हणून पाहत आहे.  

 

काँग्रेसचे राजस्थानमध्ये ३ मुस्लिम महिलांना तिकिटे, गिरिजा व्यासही मैदानात  
काँग्रेसकडून उदयपूरमधून गिरिजा व्यास, कामा येथून जाहिदा खान, मालवीयनगर येथून अर्चना शर्मा, सादुलपूर येथून पुनिया, ओसिया येथून दिव्या मदरेणा उभ्या आहेत. भाजपकडून कोलायत येथून पूनम कंवर, सपोटरा येथून गोलामा देवी, अजमेरा दक्षिण येथून अनिता भदेल,आदी आहेत.काँग्रेसने तीन मुस्लिम महिलांना तिकीट दिले आहे.  

 

तेलंगण : टीआरएसने ४, भाजप-काँगेसने ११-११ महिला उमेदवार दिले  
हैदराबाद तेलंगणमध्येही राजकीय पक्षांनी महिलांना तिकीट देण्यात मोठेपणा दाखवला नाही. राज्यात विधानसभेच्या ११९ जागा आहेत. सर्व प्रमुख पक्षांनी या जागांवर केवळ ४० महिलांनाच तिकीट दिले आहे. सत्तारूढ तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) केवळ ४ महिलांना तिकीट दिले. काँग्रेस व भाजपने ११-११ जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे. बहुजन लेफ्ट फ्रंटने राज्यात ११ जागी महिलांना उमेदवारी दिली. टीडीपीने एका जागेवर महिलेस तिकीट दिले.  

 

सर्वात श्रीमंत उमेदवार कामिनी जिंदल, मालमत्ता ५ वर्षांत ९३ कोटी वाढली, २८७ कोटींची मालकीण  

श्रीगंगानगर राजस्थानात गेल्या निवडणुकीत सर्वात श्रीमंत राहिलेल्या कामिनी जिंदल यांची संपत्ती पाच वर्षांत ९३ कोटी रुपयांनी वाढली आहे. त्या वेळी श्रीगंगानगर जागेवरून लढत आहेत. आता त्यांची एकूण संपत्ती २८७ कोटी ४९ लाख ४५ हजार रुपये आहे. त्या जमींदारा राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवार आहेत.

बातम्या आणखी आहेत...