आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनायक दामोदर सावरकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न मिळवून देणार, भाजपच्या संकल्पपत्रात आश्वासन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध आश्वासने दिली जातात. आज भाजपने त्यांचे संकल्पपत्र प्रकाशित केले. 16 कलमी संकल्पपत्रात भाजपने दुष्काळमुक्ती, रोजगार, पाणी, शिक्षण आणि आर्थिक विकास अशा प्रमुख मुद्यात हात घातला. "संपन्न, समृद्ध आणि समर्थ महाराष्ट्राचे संकल्पपत्र" अशी भाजपने टॅगलाईन वापरली आहे. भाजपने जाहीर केलेल्या संकल्पपत्रात एक महत्वाचे आश्वासन दिले आहे. यात भाजपने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले आहे. या मुद्यावरून पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले. भाजप आणि शिवसेना दोघांनीही याआधीपासूनच सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी वारंवार केली आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने अभ्यासक्रमामधून सावरकरांसाठी वीर हा शब्द वगळला होता. तसेच सावरकर यांनी तुरुंगातील त्रासाला कंटाळून ब्रिटीश सरकारकडे माफीनामा सादर केल्याचे पुस्तकात म्हटले होते. तसेच, त्यांचा गांधी हत्येच्या कटात सहभाग असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. यातच आता भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याने परत हा मुद्दा उठण्याची चिन्हे आहेत.  

बातम्या आणखी आहेत...