आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची चौथी यादी जाहीर...विनोद तावडे, प्रकाश मेहतांचा पत्ता कट; या सात उमेदवारांची वर्णी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपने आज आपली चौथी यादी जाहीर केली. मात्र या यादीतही विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि बावनकुळे या दिग्गजांचे तिकीट कापण्यात आले आहे. दरम्यान एकनाथ खडसेंच्या सुकन्या रोहिणी खडसेंना मुक्ताईनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. 
 

विद्यमान आमदारांचा पत्ता कट करून दुसऱ्यांना संधी 
भाजपने जाहीर केलेल्या चौथ्या यादीत विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी इतरांनी संधी देण्यात आली आहे. कुलाबा मतदारसंघामधून राज पुरोहित यांना उमेदवारी न देता राष्ट्रवादीतून आलेल्या राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिक पूर्वमधून विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांचा पत्ता कापला असून त्यांच्या जागी राहुल डिकळे यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर तुमसरमधील विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना डावलून प्रदीप पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

भाजपची चौथी यादी
घाटकोपर पूर्व - पराग शहा 
चरणसिंह ठाकूर - काटोल 
सुनील राणे - बोरवली  
प्रदीप पडोळे - तुमसर
राहुल डिकळे - नाशिक पूर्व  
राहुल नार्वेकर - कुलाबा
रोहिणी खडसे - मुक्ताईनगर
 
 

बातम्या आणखी आहेत...