आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Announces Second List Of 14 Candidates, Eknath Khadse, Vinod Tawde And Chandrasekhar Banwakule Are Still On The Waiting List.

भाजपने जाहीर केली 14 उमेदवारांची दुसरी यादी, एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बानवकुळे अद्याप वेटींगवर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपच्या या यादीत 14 जणांच्या नावाची घोषणा केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीमध्येही भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बानवकुळे यांच्या नावाची घोषणा झालेली नाहीये. भाजपने याआधी 125 जणांच्या नावाची यादी जाहीर केली होती. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनेक आयारामांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. पण, निष्ठावंतांना उमेदवारी अद्याप जाहीर न झाल्या त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. पण, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव जाहीर झालेले नाही. या यादीत बारामतीतून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत एकूण 14 नावांचा समावेश आहे. यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप 146, शिवसेना 124 तर मित्र पक्षांसाठी 18 जागा, असा फॉर्म्यूला ठरला आहे. 

भाजपची दुसरी यादी
1) मोहन गोकुळ सुर्यवंशी - साक्री
2) प्रतापदादा अरुणभाऊ अडसाद - धामणगाव रेल्वे
3) रमेश मावस्कर - मेळघाट
4) गोपाळदास अग्रवाल - गोंदिया
5) अमरिशराजे आत्रम - अहेरी
6) निलय नाईक - पुसद
7 नामदेव ससाणे - उमरेड
8) दिलीप बोरसे - बागलन
9) कुमार उत्तमचंद ऐलानी - उल्हासनगर
10) गोपीचंद पडळकर - बारामती
11) संजय (बाळा) भेगडे - मावळ
12) नमिता मुंदडा - केज
13) शैलेश लाहोटी - लातूर (शहर)
14) अनिल कांबळे - उदगीर