आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने जाहीर केली उमेदवारांची तिसरी यादी, एकनाथ खडसे अद्याप वेटींगवर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्यी तिसरी यादी जाहीर केली. भाजपच्या तिसऱ्या यादीत 4 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीतही भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला नाही. पहिल्या आणि दुसऱ्या यादीत समावेश नसल्याने पक्षाने त्यांना डावलले असल्याची जोरदार चर्चा आहे. 

भाजपच्या तिसऱ्या यादीत शिरपूरमधून काशीराम पवार, रामटेकमधून डॉ. मल्लिकार्जून रेड्डी, साकोळीमधून परिणय फूके आणि मालाड पश्चिममधून रमेश सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजने तिसऱ्या यादीतही एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या दिग्गद नेत्यांना उमेदवारी न दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसाल आहे. भाजपचे आता फक्त तीन उमेदवार घोषित होणे बाकी आहेत, त्यामुळे या तिघांपैकी नेमका कोणाचा नंबर चौथ्या यादीत लागतो, का या तिघांनाही डच्चू देण्यात येतो, हे पाहणे महत्वाचे आहे.

'मी का नको या सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या, नाही उत्तर दिलं तरी चालेल'

दरम्यान, एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधून म्हणाले की, "तुम्ही 3 दिवसांपासून इथे आहात. आपण सर्वजण भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. आपण पक्षाच्या आदेशाचे नेहमीच पालन करत आलो आहे. मला स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितला, तेव्हा एका मिनिटात राजीनामा दिला. पक्षाने मंत्रिपद दिले, पक्षाने आदेश दिला मंत्रिपद सोडले. त्यामुळे, आपल्या भावना स्वाभाविक आहे." 

"गेली 30 वर्ष तुम्ही मला निवडून देत आहात. भाजपचे अस्तित्व इथे नव्हतेच, अशा परिस्थितीत तुमच्या सहकार्याने पक्ष वाढला. एखादा विषय आपल्या आकलनाच्या पलिकडचा असतो. पक्षाने मला सांगितले तुम्हाला तिकीट देणार नाही, तुमच्याऐवजी कुणाला द्यायचे हे तुम्ही सांगा. त्यावर मी सांगितले की आपण काही सांगू शकणार नाही, कारण माझे सारे कार्यकर्ते हे एकनाथ खडसे आहेत. "मी का नको या सोप्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर माझं समाधान होईल, नाही उत्तर दिलं तरी चालेल." मी काही इतका मोठा माणूस नाही की पक्षाला काही विचारू शकेन. जो काही पक्ष निर्णय घेईल, तो आपण मान्य करु. शांतता ठेवा." असी प्रतिक्रीया खडसेंनी व्यक्त केली.
 

बातम्या आणखी आहेत...