आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही त्यांना बरनॉल लावण्याचा सल्ला नाही देणार - आदित्य ठाकरे; ते तुम्ही जपून ठेवा, सहा महिन्यांनी तुम्हालाच लागेल - भाजप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सत्ता गेल्यामुळे विरोध पक्ष शिवसेनेवर जळतो - आदित्य यांची टीका
  • शिवसेनेसोबत असणारी विचारधारा कधी आग लावेल सांगता येणार नाही - भाजप

रत्नागिरी - शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी भाजपवर निशाणा साधला होता. "सत्तेत असणारे आता सत्तेबाहेर पडले आहेत. यामुळे ते दु:खी आहेत आणि शिवसेनेवर जळतात. मात्र मी त्यांना बरनॉल लावण्याचा सल्ला देणार नाही" अशा शब्दात आदित्य यांनी भाजपला टोला लगावला होता. दरम्यान "बरनॉल जपून ठेवा कारण सहा महिन्यांनी तुम्हालाच त्यागी गरज भासेल" अशा शब्दात भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. 

काय म्हणाले प्रसाद लाड?

  • शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. बरनॉल जपून ठेवा, सहा महिन्यानंतर तुम्हालाच त्याची गरज भासेल कारण शिवसेना ज्या विचारधारेसोबत आहेत ती कधी आग लावेल हे कळणार नाही असे लाड म्हणाले.
  • सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री करणार हा मुद्दा मागे राहिला. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक हा सर्वसामान्यच राहिला. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील लोक आमदार आणि मुख्यमंत्री होत आहेत. यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार राहिला नाही.
  • भाजप संघर्षातून पुढे आलेला आहे. भाजपला सत्तेची हाव नाही. भाजपला विरोधी पक्षात बसण्याची सवय आहे. आम्ही विरोधीपक्ष म्हणून काम करणार.

नेमकं काय आहे बरनॉल क्रीम प्रकरण?


पहाटे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नंतर राजीनामा दिला. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा व्हायरल झाले होते. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या समर्थकांनी भाजप समर्थकांना मीम्समधून टोला लगावला होता. याच मीम्समध्ये अनेकदा बरनॉल क्रीमचा उल्लेख झाल्याचे पाहायला मिळाले होते. सत्तास्थापनेनंतर आनंद व्यक्त करणाऱ्या भाजप समर्थकांचा फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर जळफळाट झाला असेल तर बरनॉल लावावं, असा सल्ला दिला जात होता.