आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडून राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड यांना उमेदवारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि औरंगाबाद महापालिकेचे माजी महापौर भागवत कराड यांना पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने यापूर्वी बुधवारी भाजपचे नवीन सदस्य उदयनराजे भोसले आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना राज्यसभेचे उमेदवार घोषित केले. आता तिसऱ्या उमेदवारासाठी अनेक जणांची नावे चर्चेत असताना भाजपकडून भागवत कराड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जाणारे भागवत कराड वंजारी समाजाचे नेते आहेत. तसेच ते भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत.

खडसेंना पुन्हा डावलले
खानदेशातील भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी वेळोवेळी पक्षाकडून डावलले जात असल्याची खंत व्यक्त केली. त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचे तिकीट सुद्धा देण्यात आले नाही. यानंतर त्यांना केंद्रीय राजकारणात घेतले जाणार अशी चर्चा होती. एवढेच नव्हे, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी राज्यसभेचे दोन उमेदवार घोषित केले. त्यानंतर तिसरे नाव खडसेंचे असावे असा आमचा आग्रह आहे असे माध्यमांशी बोलताना सांगितले होते. तरीही त्यांच्या विधानाच्या अवघ्या दुसऱ्याच दिवशी भाजपकडून भागवत कराड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...