आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

 फोडाफोडी केल्याशिवाय भाजपला सत्ता टिकवणे अशक्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1 भाजप 105 + राष्ट्रवादीचे 30 बंडखोर + अपक्ष 13 = 148

> भाजपचा दावा, तो कायदेशीरदृष्ट्या अशक्य दिसतो. 

> अजित पवार : आपल्यासोबत ३० आमदार आहेत. पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांशपेक्षा कमी आमदार वेगळा गट किंवा पक्षांतर करू शकत नाही. त्यांनी असे केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होईल.

> राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार सभागृहात गैरहजर राहिल्यास बहुमताचा आकडा १२९ च्या जवळपास येतील. तरीही भाजपला २४ आमदारांची गरज असेल. ते तूर्त शक्य दिसत नाहीत.2  राज्यपालांनी अजितदादा आणि समर्थकांची हकालपट्टी रद्द तर...
 
> बहुमत आकडा ११७, भाजपला १२ आमदारांची गरज


>  राज्यपालांनी विधिमंडळ नेतेपदावरून अजितदादांच्या हकालपट्टीची राष्ट्रवादीची कारवाई अमान्य केली तर पक्षाच्या आमदारांना अजितदादांच्या व्हीपनुसार मतदान करावे लागेल. न केल्यास ते कारवाई करू शकतात. यामुळे भाजपसाठी बहुमताचा आकडा ११७ वर येईल. १२ अपक्षांच्या मदतीने तो सहज गाठला जाऊ शकतो. 

(तज्ज्ञांनुसार, राष्ट्रवादीने आमदारांच्या बैठकीत हकालपट्टीची प्रक्रिया व जयंत पाटलांची नियुक्ती करत पत्रही राज्यपाल कार्यालयाला दिले आहे.)
 

3  56 शिवसेना + 50 राष्ट्रवादी + 40 काँग्रेस = 146 (बहुमत)

> महाआघाडी एकसंध राहिल्यास भाजप सरकार कोसळेल

राष्ट्रवादीचे ४, तर काँग्रेसचे ४ आमदार वगळून.

ज्यांचा विधानसभा अध्यक्ष त्यांचे सरकार

> विश्वासदर्शक ठरावाअाधी गुप्त मतदानाने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक हाेईल. आपला अध्यक्ष करून शक्तिप्रदर्शनात अजितदादांचाच व्हीप वैध ठरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 

> मात्र अध्यक्ष निवडीतच राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी जयंत पाटलांचा व्हीप मानून आघाडीचा अध्यक्ष निवडून आणला तर मात्र नवा अध्यक्ष अजितदादांची हकालपट्टी वैध ठरवू शकताे व भाजपचे सरकार अडचणीत येऊ शकते.बातम्या आणखी आहेत...