आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी-शाहंनी घेतली आडवाणी आणि जोशींची भेट; मुरली मनोहर जोशी म्हणाले- 'आम्ही बी रोवले, आता फळ देण्याची जबाबदारी तुमच्यावर'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची सदिच्छ भेट घेतली. मोदींनी ट्विटरवर भेटीचा फोटो पोस्ट करत लिहीले- ''भाजपाने आज विजय मिळवला, कारण आडवाणीजींसारखे लोक मागील अनेक वर्षांपासून पक्षाला मजबूत केले आहे." अडवाणींनंतर त्या दोघांनी भाजपचे अजून एक जेष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचीदेखील भेट घेतली. आडवाणी-जोशी भाजपच्या मार्गदर्शक मंडळात आहेत.


"आता स्वादिष्ट फळ देण्याची जबाबदारी"
पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर मुरली मनोहर जोशींनी मीडियाशी बोलताना म्हणाले, "ही आमच्या पक्षाची परंपरा आहे. आम्ही जेष्ठांकडून आशिर्वाद घेतोत, म्हणजे भविष्यात आपण चांगले काम करू शकोल. त्यासाठीच पंतप्रधानजी आणि अध्यक्षजी येथे आले होते. त्या दोघांनी चमत्कारी आकडा पार केला आहे. आम्ही फक्त बी रोवले होते, आता देशाला स्वादिष्ट फळ देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे." 


"एक गोष्ट स्पष्ट होती की, देशात मजबुत सरकार बनवण्याची आवश्यकता होती. त्यामुळे भाजप आणि मोदींशिवाय दुसरा पर्यात नव्हता. विरोधी त्यांच्यासमोर काहीच करू शकले नाहीत. मी आशा करतो की, पक्षाने चांगले काम करून नागरिकांना योग्य त्या गोष्टी पुरवाव्यात." 


30 मे रोजी होईल शपथविधी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नरेंद्र मोदी 28 मे रोजी आपला मतदारसंघ वाराणसीत आभार रॅली करणार आहेत. त्यानंतर 30 मे ला त्यांचा शपथविधी होणर आहे. 23 मे ला आलेल्या आकडेवारीनुसार भाजपा+ ला 352, काँग्रेस+ ला 87 आणि इतर पक्षांना 103 जागांवर विजय प्राप्त झाला आहे. भाजपाने स्वबळावर 302 जागा जिंकल्या.