आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला. त्यामुळे आता आम्ही सरकार स्थापन करणार नाही. असे भाजपने राज्यपालांना कळवले आहे. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना, भाजप आणि महायुतीला स्पष्ट बहुमत दिले होते. परंतु, शिवसेना आमच्यासोबत येत नाही. शिवसेना जनादेशाचा अपमान करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापित करत असेल तर आमच्याकडून शुभेच्छा... असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. भाजप सत्ता स्थापन करू शकत नाही हे राज्यपालांना कळवले असेही ते पुढे म्हणाले. आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना वर्षा बंगल्यावर भाजप कोअर टीमची दुसरी बैठकही संपली. या बैठकीनंतर भाजपची नेते मंडळी थेट राजभवनावर रवाना झाले. संध्याकाळी 4 वाजता सुरू झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय नेते भूपेंद्र यादव यांचीही उपस्थिती होती. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगच्या माध्यमातून सर्वांचे मार्गदर्शन केले. या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि भूपेंद्र यादव यांच्यासह पंकजा मुंडे यांनी देखील उपस्थिती नोंदवली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजपचे नेते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.