आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे स्वीकृत‍ नगरसेवक गणेश बीडकर यांच्या मांडीत घुसली गोळी, पिस्तुल साफ करताना झाले फायर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भाजपचे स्वीकृत नगरसेवक गणेश बीडकर यांच्या पायाला गोळी लागली आहे. गुरुवारी दुपारी त्यांच्या राहात्या घरी हा प्रकार घडला. बीडकरांच्या मांडीत गोळी घुसली आहे. पिस्तुल साफ करताना फायरिंग झाल्याचे बोलले जात आहे. बीडकर यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

 

मिळालेली माहिती अशी की, गणेश बीडकर हे गुरुवारी दुपार त्यांच्याकडे असलेले पिस्तूल साफ करीत होते. मिस फायर होऊन गोळी त्यांच्य पायाला लागली. गोळी थेट त्यांच्या मांडीत घुसली. त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लि‍निकमध्ये दाखल करण्‍यात आले आहे.

 

कोण आहेत गणेश बीडकर?
गणेश बीडकर हे पुणे महापालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक आहेत. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवले आहे. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत बीडकरांचा पराभव झाला होता. मात्र, त्यानंतर भाजपने त्यांचे स्वीकृत नगरसेव म्हणून पुनर्वसन केले होते.

बातम्या आणखी आहेत...