आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखोर चंद्रकांत बिराजदारांसोबत भाजप जिल्हाध्यक्ष लाहोटी यांचे 'तिरुपती दर्शन'

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

लातूर : महापौर निवडणुकीत काँग्रेसची साथसंगत करीत उपमहापौरपद मिळवणारे बंडखोर भाजप नगरसेवक चंद्रकांत बिराजदार सध्या तिरुपती बालाजी दर्शनासाठी गेले आहेत. आणि त्यांच्यासोबत आहेत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी. विशेष म्हणजे याच लाहोटींनी आठ दिवसांपूर्वी बंडखोरी केल्याबद्दल चंद्रकांत बिराजदारांना भाजपतून काढून टाकले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपला लातूर मनपामधली सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे लातूर भाजप व लातूरमधील भाजपच्या नेत्यांची नाचक्की झाली. भाजपने महापौरपदासाठी शैलेश लाहोटी तर उपमहापौरपदासाठी भाग्यश्री कौळखैरे यांना उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसने महापौरपदासाठी विक्रांत गोजमगुंडे यांना उमेदवारी दिली, परंतु उपमहापौरपदासाठी उमेदवारच दिला नाही. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी शैलेश गोजमगुंडेंचे नाव या पदासाठी निश्चित केले होते. मात्र शैलेश लाहाेटींनी महापौर, उपमहापौर पदासाठी आपली वेगळी नावे निश्चित केली होती. दोघात नावावरून मतभेद झाल्यामुळेच देविदास काळे यांनी महापौरपदासाठी अर्ज भरला व शेवटच्या पाच सेकंदात काढून घेतला. त्यानंतर चंद्रकांत बिराजदार यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अर्ज भरला. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी चंद्रकांत बिराजदार व गीता गौड यांनी भाजपच्या विरोधात मतदान केले आणि भाजपचे अधिकृत उमेदवार शैलेश गोजमगुंडेंचा पराभव झाला, तर काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे विजयी झाले.

तिरुपतीला नवस फेडला

मनपा निवडणुकीत मनासारखे झाल्यास इष्टमित्रांसह तिरुपतीला येऊ असा नवस भाजपच्याच काही लोकांनी केला होता, असे समजते. त्यानुसार मनपा पदाधिकारी निवडी, त्यानंतरचे वाद, पक्षातून हकालपट्टी असे सगळे वादळ शमल्यानंतर हा तिरुपती दौरा झाल्याचे समजते. खरे खोटे भगवान तिरुपती, नवस करणारे व दर्शनाला जाणाऱ्यांनाच ठाऊक, परंतु या घडामोडीत ज्या शैलेश लाहोटींनी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांना ८ दिवसांपूर्वी बडतर्फ केले त्यांच्यासोबतच लाहोटी दर्शनाला कसे गेले याची चर्चा होत आहे. या दर्शन दौऱ्यात भाजपचे नगरसेवक देविदास काळेे, सुनील मलवाड, भाजप नेते अमोल पाटील गोंद्रीकर, गणेश हेड्डा हेही सामील झाले होते.
 

बातम्या आणखी आहेत...