आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या हिंदीमध्ये प्रादेशिकतेचा अनुस्वार नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवनीत गुर्जर

हिंदी एक अशी भाषा आहे, जी अनेक क्षेत्रीय आणि स्थानिक बोलींमुळे समृद्ध झाली आहे. बोली तिच्यात रस मिसळतात आणि स्थानिक लयीमुळे तिला स्वाद येतो. भारतीय राजकारणात राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांसाठी यासाठी मैत्री करतात की त्यांच्या राष्ट्रीयतेत प्रादेशिकतेची सुगंध मिसळावा. काही असे चेहरे मिळावे, की त्यांना पाहून सामान्य माणसाला ते आपले वाटावे. त्यांच्या घरी कधीही जाता येते. हे दिल्लीवरून येऊन धडकलेले इंग्रज नाहीत, की मत लुटल्यावर गायब होतील.

परंतु, भाजपने प्रादेशिकतेचे महत्व कमी लेखले. प्रादेशिक पक्षांना बळ देण्याऐवजी त्याने त्यांना संपवण्याची सुपारी घ्यायला सुरूवात केली. महाराष्ट्रात शिवसेना, झारखंडमध्ये ऑल झारखंड स्टुडंटस् युनियन आणि अनेक प्रदेशांतील छोट्या- छोट्या पक्षांना संपवणे, त्यांच्या नेत्यांना आपल्या पक्षात आणून कुजवणे, हे सगळे भाजपला चांगले वाटत होते, कारण त्यांना आपणच सर्वव्यापी होत आहोत, असे वाटते होते. मात्र, आता स्पष्ट दिसतेय की सर्वव्यापी होण्याच्या या धडपडीत, सार्वभौम म्हणवून घेण्याच्या राजसूय यज्ञात त्यांचा घोडा वेगाने धावला खरा, पण त्या धावेखाली प्रादेशिकता, स्थानिकता तुडवली गेली.

सगळे प्रादेशिक पक्ष भाजपपासून दूर गेले आहेत. ठीक आहे, तुम्ही लोकसभा निवडणुका जिंकता, कारण त्याची पाककृती तुम्हाला जमलीय. लोकांनाही वाटते की देशासाठी तुम्ही योग्य आहात. काही ना काही करीत असता. काँग्रेसच्या काळाप्रमाणे मोठ-मोठे घोटाळे कानावर येत नाहीत. भ्रष्टाचार दिसत नाही. देशाची चर्चा करता. देशाला जिंकता, पण राज्यांचे काय?

प्रादेशिक पक्षाप्रमाणे तुम्ही तुमच्या प्रादेशिक नेत्यांनाही खड्ड्यात पाडलं. तुम्ही जिंकता तेव्हा मुख्यमंत्री म्हणून एक नवे नाव पुढे आणता. ते नाव ना आधी ऐकलेले असते, ना तो चेहरा ओळखीचा असतो. प्रत्येक वेळी आश्चर्याचा धक्का देण्याची तुमची पद्धत चांगली वाटते, पण कुणाला असा धक्का द्यायचा असतो? एकामागून एक राज्ये तुम्हाला धक्का देत जाताहेत. केवळ प्रादेशिक पक्ष आपले मित्र नव्हे, तर सेवक बनून राहावे या हट्टामुळे एका वर्षांत पाच मोठी राज्ये गमावली. काही पक्ष, काही वर्षे सोबत राहिलेही, सेवक बनून. पण, किती दिवस? मैत्रीचा जो थोडाफार अंश उरला होता, तोही हळूहळू मरत गेला आणि शेवटी मरुनच गेला. परिणाम समोर आहेत. मैत्रीच्या मृत्यूवरील अमृता प्रीतम यांच्या या ओळी वाचा...


'दोस्ती को मरना था, सो मर गई!
और दोस्त!
तू किए जा जो जी में आए!
अब इसका कफ़न,
एक मैली दरी का हो, या जरी का!
क्या फ़र्क़ पड़ता है!
यह क़यामत की रात तो नहीं,
...कि इसकी लाश कब्र
से उठे!'

नवनीत गुर्जर, नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर