आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात भाजपचे जनसंपर्क अभियान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - गोवा विधानसभेच्या 3 मार्च रोजी होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सोमवारी जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली. 15 दिवसांचे हे अभियान 35 मतदारसंघांमध्ये राबवले जाणार आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी येथील ऐतिहासिक आझाद मैदानावर अभियानाला हिरवा झेंडा दाखवला. माजी मुख्यमंत्री आणि गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते मनोहर र्पीकर यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्क अभियान होणार आहे. राज्य आणि केंद्राच्या दुहेरी अँटी इन्कम्बसी फॅक्टरचा फायदा भाजपला होईल, अशी आशा र्पीकर यांनी व्यक्त केली.