आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे ईव्हीएमविरोधात उभारत असलेल्या आंदोलनाची भाजपाला भीती, म्हणून चौकशीद्वारे आवाज दाबण्याचा प्रयत्न - मनसे नेता संदीप देशपांडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. 'कर नाही त्याला डर कशाला? आम्ही चौकशीला समोरे जाऊ' असे म्हणत आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास मनसे रस्त्यावर उतरेल असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
 

सीबीआय, ईडी भाजपाचे कार्यकर्ते
संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे नवीन भारताचे नवीन हिटलर आहेत.  जो कोणी त्यांचे प्रकरणे बाहेर काढेल किंवा भाजप विरोधात बोलेल त्यावर दबावतंत्र आणण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. तसेच सीबीआय, ईडी भाजपचे कार्यकर्ते झाले आहेत. त्यांच्याशी कसं डील करायचे हे मनसेला माहित आहे. 
 

राज ठाकरे उभारत असलेल्या आंदोलनाची भाजपला भीती
राज ठाकरे ईव्हीएमविरोधात उभे करत असलेल्या आंदोलनाची भाजपाला भीती आहे. गेल्या पाच वर्षांच कोणत्या भाजप नेत्याची सीबीआय किंवी ईडी चौकशी झाली का? असा सवाल सुद्धा देशपांडे यांनी केला आहे. 
 

संदीप देशपांडेचे ट्वीट
जर सरकार सत्याचं असेल, तर पहिले मुंबई बॅंकेत काहिशे कोटींचा घोटाळा करणा-या भाजपाच्या आमदारांची चौकशी करा.. नोटीस काढायची गरजपण लागणार नाही, अर्ध्यापेक्षा भाजपाचे घोटाळेबाज आमदार जेलमध्ये असतील असे ट्विट संदीप देशापांडे यांनी केले आहे. 
 

राजकीय सुडापोटी कारवाई -  राजू शेट्ट
EVM विरोधी भूमिका घेतली म्हणून राज ठाकरेंना ED ची नोटीस. कोणत्याही गैरव्यवहाराचं समर्थन नाही, पण सरकार राजकीय सूडापोटी कारवाई करत असल्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी म्हणाले.