आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Lok Sabha 2019: भाजपची तिसरी यादी जाहीर! पाटणा साहिब येथून रवीशंकर प्रसाद, पुरी येथून संबित पात्रांना उमेदवारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने लोकसभेसाठी पाटणा हुजूर साहिब येथून बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्या जागी आता केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद येथून निवडणूक लढवणार आहेत. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी शुक्रवारी रात्री उशीरा जारी केली. यात महाराष्ट्रातून 6 आणि आंध्र प्रदेशातील 23 उमेदवारांसह 36 अधिकृत उमेदवारांची नावे आहेत. यासोबत इतर उमेदवारांमध्ये ओडिशातून 5 उमेदवार आणि आसाम तसेच मेघालयातून एक-एक उमेदवाराचा समावेश आहे. विशेष म्हणजे, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना यंदा ओडिशातील पुरी येथून उमेदवारी देण्यात आली आहे.


शत्रू भाजप सोडणार असल्यावर शिक्कामोर्तब!
भाजपमध्ये राहून भाजप आणि नेतृत्वावर टीका करणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी 2014 मध्ये पाटणा येथूनच भाजपसाठी लोकसभेची जागा जिंकली होती. परंतु, पंतप्रधान आणि भाजवर वेळोवेळी होणाऱ्या टीकांमुळे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद सोडावे लागले. पंतप्रधानांवर खुलेआम टीका करत असतानाही पक्षाने त्यांच्यावर अद्याप कुठल्याही स्वरुपाची अधिकृत कारवाई केली नव्हती. परंतु, आता त्यांना तिकीट नाकारल्याने शत्रु काँग्रेस किंवा इतर पक्षात जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. काही दिवसांपूर्वी माध्यमांनी दावा केला होता, की शत्रुघ्न सिन्हा यांना काँग्रेस पाटणा हुजूर साहिब येथूनच उमेदवारी देऊन रवीशंकर प्रसाद यांच्या विरोधात उभे करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...