आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमधून भाजपने दिली सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी, 'आयारामां'चाही समावेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून विविध पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. यातच अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भाजपने अखेर आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. 125 उमेदवारांची पहिली यादी भाजपकडून जाहीर करण्यात आली. यात भाजपने आपल्या अनेक विद्यमान आमदारांना परत उमेदवारी दिली आहे. या यादीत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व  मतदारसंघातील विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जाहीर केलेल्या भाजपच्या उमेदवार यादीत नगर जिल्ह्यातील भाजपच्या सर्व विद्यमान आमदारांचा समावेश आहे. यात श्रीगोंद्यातून आमदार बबनराव पाचपुते,कोपरगावमधून स्नेहलता कोल्हे, नेवासामधून बाळासाहेब मुरकुटे, राहुरीमधून शिवाजीराव कर्डिले, शेवगाव पाथर्डीमधून मोनिका राजळे, कर्जत जामखेडमधून प्रा. राम शिंदे, शिर्डीमधून राधाकृष्ण विखे आणि अकोलेमधून वैभव पिचड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.