आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रों! मोदी है तो मुमकिन है, काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणे कठीणच; भाजप 300 पार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मोदी लाट अतूट आणि अटल सिद्ध झाली. गैरकाँग्रेसी सरकार बहुमतासह पुन्हा सत्तेत येण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०१४ मध्ये २८२ जागा मिळवणाऱ्या भाजपने यावेळी ३०० चा आकडा पार केला, तर एनडीएने ३४८ पर्यंत मजल मारली. सर्वांना आश्चर्यचकित करणारा निकाल अमेठीतून आला. तेथे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींचा पराभव झाला. मात्र, केरळच्या वायनाडमधून ते विजयी झाली. निवडणूक निकालाने सेन्सेक्सला अधिक उंचीवर नेले. माेदी सरकारला सलामी देत सेन्सेक्सने प्रथमच ४० हजारांची पातळी ओलांडली. मात्र, नंतर तो घसरणीसह बंद झाला. दरम्यान, विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या टि्वटरवरून ‘चौकीदार’ शब्द हटवत म्हटले की, देशवासीयांनी चौकीदार बनून देशासाठी मोठे कार्य केले आहे. मात्र, अाता याला पुढच्या स्तरावर नेण्याची गरज आहे. पराभव झालेल्या दिग्गजात लोकसभेत काँग्रेसचे नेते राहिलेले मल्लिकार्जुन खरगे यांचाही समावेश आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी त्या पक्षाला १० टक्के जागा हव्यात. म्हणजेच ५४३ लोकसभेच्या जागांपैकी एकूण ५५ जागा त्या पक्षाला असणे आवश्यक असते, तरच त्या पक्षाला विरोधी नेतेपद मिळते. काँग्रेसला ५५ पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या वेळीही त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणे कठीणच आहे. 
 

एनडीए : 348

2014  जागा 336 (मते 38.5%)

 

भाजप : 303

2014   जागा 282 (मते 31.3%)

 

यूपीए : 80

2014   जागा 59 (मते 23.3%)  

 

काँग्रेस : 51

2014   जागा 44 (मते 19.5%) 

 

इतर : 114

2014   जागा 148 (मते 38.2%) 

 

विजयानंतर मोदींची ३ आश्वासने 

1 काम करताना चुका होत असतात, मात्र वाईट हेतू व वाईट पद्धतीने काही करणार नाही. 
2 मी स्वत:साठी काहीच करणार नाही, जे काही करणार ते फक्त देशासाठीच. 
3 माझा क्षण न् क्षण आणि माझ्या शरीरातील कण न् कण देशासाठी असेल.

 

नरेंद्र मोदी आता जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या पंगतीत 

४८ वर्षांनंतर एखाद्या पक्षाला सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळाले. नेहरू व इंदिरा गांधी यांच्यानंतर असा विजय मिळवणारे मोदी पहिलेच गैरकाँग्रेसी. यापूर्वी १९७१ मध्ये इंदिरा यांना असे बहुमत मिळाले होते. 

 

> ८ राज्ये, जेथे भाजपने पूर्ण जागा जिंकल्या...दिल्ली, गुजरात, राजस्थानचा समावेश 

> भाजपचे १०२ उमेदवार ३ लाखांहून जास्त मताधिक्याने विजयी झाले 

> १४ राज्यांत काँग्रेसला एकही जागा नाही. दुहेरी आकडा केरळात गाठता आला. 

> राहुल यांचाही पराभव, अमेठीत स्मृती इराणींकडून पराभव, वायनाडमध्ये विजयी

 

38.5% मतांसह  (+7.5%) मतांसह भाजप येणार सत्तेत
             वर्ष      जागा    मतांचे प्रमाण
नेहरू    1952     364        45%
           1957     371        48%
           1962     361        45%


इंदिरा    1967    283      41%
            1971    352      44%


मोदी    2014    282       31%
          2019     301       38.5%