आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP Government Suppresses Protest In A Dictatorial Manner: Priyanka Gandhi Criticises BJP

भाजप सरकार हुकूमशाही पद्धतीने आंदाेलन दडपतेय : प्रियंका गांधीची भाजपवर टीका

9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : भाजप सरकार हुकूमशाहीने वागू लागले आहे. त्यामुळे संविधानाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदाेलक विद्यार्थी, बुद्धिवादी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदाेलनास दडपत आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी केली.

प्रियंका पुढे म्हणाल्या, समाजातील विविध घटकांना काय वाटते? हे जाणून न घेता त्यांना अशी वागणूक दिल्याबद्दल मी सरकारचा निषेध करते. अशा प्रकारे संविधानावर हल्ला करणे खपवून घेतले जाणार नाही. सरकार आंदाेलकांवर बळाचा वापर करत आहे. सामान्य जनतेने महात्मा गांधी यांनी िशकवलेल्या सत्य व अहिंसेच्या मार्गाने आंदाेलन करावे.

काेणालाही संविधानावर हल्ला करण्याची परवानगी दिली जाऊ नये, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी याप्रसंगी केले.काँग्रेस नेत्यांची २२ डिसेंबर राेजी बैठक होणार आहे. जयपूरमध्ये एका माेर्चाची याेजना तयार करण्यात आली आहे. या आंदाेलनात पक्षाचे माजी प्रमुख राहुल गांधीदेखील सहभागी हाेणार आहेत. सीएएच्या विराेधात देशव्यापी आंदाेलनात काँग्रेस अद्याप थेट सहभागी झालेली नाही.

एका व्हिडिआे संदेशात साेनिया गांधी म्हणाल्या, विद्यार्थी-नागरिकांच्या िवराेधात बळाचा वापर झाला. ही गंभीर बाब आहे. म्हणूनच आम्ही या आंदाेलनात एकजूट दाखवत आहाेत, असे त्यांनी म्हटले आहे.

तामिळनाडूत निदर्शने सुरूच

तमिळनाडूत विविध मुस्लिम संघटना व राजकीय पक्षांनी नागरिकत्व दुरुस्त कायद्याच्या विराेधात शनिवारी सलग सहाव्या दिवशीही आंदाेलन सुरूच ठेवले. चेन्नई, मदुराई, तंजावर, नागपट्टिणमसह अनेक ठिकाणांवर मुस्लिम संघटनांनी निदर्शने केली. चेन्नईत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. चेन्नई सेंट्रल रेल्वेला घेराव घालण्याचाही प्रयत्न केला. सीएएबाबत केंद्र सरकारच्या विराेधात यावेळी घाेषणाबाजी करण्यात आली.


देशभरात आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या घटनेनंतर चेन्नईत महिलांनी शुक्रवारी आंदोलन केले होेते.