आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Has Fielded 28 Year Old Tejasvi Surya From The Prestigious Bengaluru South Lok Sabha Seat

अचानक BJP कडून मिळाले लोकसभेचे तिकीट, चकित झाला 28 वर्षीय तरूण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क(बेंगळुरू)- कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाने यावेळी दक्षिणी बेंगळरूच्या लोकसभेची जागा 28 वर्षीय तेजस्वी सूर्याला दिली आहे. ही सीट पारिंपारीकरित्या पक्षाचे दिग्गज दिवंगत नेते अनंत कुमार यांची होती, 1996 पासून त्याने सहावेळा येथून लोकसभेची जागा जिंकली होती. त्यांच्या निधनानंतर पक्षाने यावेळी नवीन तरूण चेहऱ्याला तिकीट दिले आहे. तसे पाहता सुर्याचे वय कमी असले तरी, त्याच्याकडे राजकारणाचे ज्ञान कमी नाहीये. सुर्या एक विद्यर्थी नेता होते आणि ABVP चे कार्यकर्तेदेखील राहीले आहेत.

 

व्यावसायाने वकील आहे सुर्या, हायकोर्टात करतात प्रॅक्टिस

- सूर्या कर्नाटकच्या चिकमंगलूर जिल्ह्याचे राहणारे आहेत आणि ते बासावानगुडी विधानसभेचे आमदार एल.ए. रविसुब्रमण्यन यांचे पुतणे आहेत. सूर्या व्यावसायाने वकील आहेत आणि बेंगळरूच्या इंस्टिट्यूट ऑफ लीगल स्टडीजमधून त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले आहे. ते कर्नाटकच्या हायकोर्टात प्रॅक्टिसपण करतात. त्याशिवाय सध्या ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश महासचिव आहेत आणि नॅशनल सोशल मीडिया टीमचे सदस्यदेखील आहेत.


कांग्रेसच्या या दिग्गज नेत्याला देणार टक्कर

- भाजपने सूर्या यांना दक्षिणी बेंगळुरूचे सीट दिले आहे, या जागेवर त्यांच्या समोर काँग्रेसचे दिग्गज नेता बी.के. हरिप्रसाद असतील. जर सुर्या यांनी निवडणूक जिंकली तर ते या मतदारसंघातील सगळ्यात तरूण खासदार असतील.
- माजी खासदार दिवंगत भाजप नेते अनंत कुमार यांची पत्नी तेजस्विनीदेखील तिकीटाच्या लाइनमध्ये होत्या, पण पक्षाने यावेळी युवा चेहऱ्याला पसंती दर्शवली. सगळ्यात महत्त्वाच म्हणजे, तेजस्वी यांनादेखील माहित नव्हते की, त्यांना पक्षाने तिकीट दिले आहे.


तिकीट मिळताच म्हणाले- OMG... OMG...

- भाजपचे तिकीट मिळथाच स्वत: तेजस्वीदेखील चकित होते. त्यांना बसलेल्या सुखद धक्का त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून जाहिर केला. 25 मार्चला तिकीट मिळाल्याचे कळताच त्यांनी आपल्या टविटरवर लिहीले, ''OMG... OMG...मला विश्वास बसत नाहीये...जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही देशातील पंतप्रधानांनी आणि देशातील सगळ्यात मोठ्या पक्षाने एका 28 वर्षीय तरूणावर विश्वास टाकला. असे फक्त भाजपमध्येच होऊ शकते, फक्त नरेंद्र मोदींच्या राज्यातच होउ शकते.''

बातम्या आणखी आहेत...