आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप बायोडेटावर चालणारा पक्ष नाही; नड्डा यांचा इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - भाजप हा बायोडेटावर चालणारा पक्ष नाही. त्यामुळे बायोडेटा पुढे करून उपयोग नाही. आमच्याकडे सर्वांची माहिती आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाकडून काय मिळते ही भावना ठेवण्यापेक्षा मी पक्षाला काय देऊ शकतो, असा विचार ठेऊन कामाला लागावे, असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बुधवारी भाजपच्या विदर्भ प्रदेश विजय संकल्प मेळाव्यात बोलताना दिला.नागपुरातील या मेळाव्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपच्या प्रदेश प्रभारी सरोज पांडे, सहसंघटनमंत्री व्ही. सतीश यांच्यासह विदर्भातील खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
 

शिवसेनेचा साधा उल्लेखही नाही
दरम्यान, राज्यात शिवसेना-भाजप युतीबाबत अनिश्चितता कायम असताना भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांनी युतीबाबत अवाक्षरही काढले नाही. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा उल्लेखही नड्डा यांच्या भाषणात आला नाही. राज्यात पुन्हा आपले सरकार येणार, असा ठाम विश्वास लड्डा यांनी यावेळी व्यक्त केला. 
 

बू थवर लक्ष ठेवा 
निवडणूक जिंकायची तर बुथ जिंकायला हवा. बुथची माहिती कार्यकर्त्यांना हवी. भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढच्या वेळी मी निश्चितपणे त्यांच्या बुथची माहिती विचारणार असल्याचे नड्डा यावेळी म्हणाले.
 

शिस्तीमुळेच यशस्वी
नड्डा म्हणाले, डाव्या पक्षांच्या नेत्यांतही कमिटमेंट होती. भाजपला अभूतपूर्व यश मिळत आहे. भाजपच्या नेत्यांमध्ये शिस्त आहे. त्यामुळे तीच शिस्त कार्यकर्त्यांमध्ये आढळून येते, असा उल्लेख नड्डा यांनी केला. 
 

स्कूटर रॅलीत कार्यकर्ते हेल्मेटविनाच सहभागी
गडकरींनी नवा मोटार कायदा देशात लागू केला. मात्र, नागपुरात जे.पी.नड्डा यांना स्कुटर रॅलीने विमानतळावरून दीक्षाभूमीवर आणताना अनेक कार्यकर्त्यांनी हेल्मेट घातले नसल्याचे दिसले.