आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सही देऊन देऊन सांगतो भाजप 150 जागा जिंकेल, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- महायुतीमध्ये असलेल्या भाजप, शिवसेना, रिपाइं, शिवसंग्राम आदी घटक पक्षांसोबत असलेल्या पक्षाचे 225 आमदार निवडून येतील आणि सही देऊन सांगतो की, 164 उमेदवारांपैकी निवडणूक रिंगणात एकट्या भाजपचे 150 आमदार निवडून येतील, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 16 ऑक्टोबर रोजी परतूर येथे जाहीर सभा होत आहे. या अनुषंगाने रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी भाजपच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, सावकारी कर्जातून सुटका, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री पीकविमा योजना, भाजीपाला नियमनयुक्त, ऊस उत्पादनात वाढ, जलयुक्त शिवार योजना, मराठवाडा वॉटरग्रीड, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, वीज पुरवठा, जनसामान्यांना आरोग्यकवच, स्वच्छ भारत अभियान, महारेरा, समृद्धी महामार्ग, परकीय गुंतवणूक, मराठा समाज आरक्षण, शेतीपंपांना वीज जोडणी, मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष, प्रधानमंत्री आवास योजना, हायब्रीड अॅन्युइटी योजना आदींबाबत काय सकारात्मक बदल झाले याबाबत माहिती दिली.

तसेच, जिल्ह्यात नव्याने उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांमुळे काय बदल होत आहेत, याबाबतही माहिती दिली. यासह विविध योजनांमुळे किती नागरिकांना लाभ झाला, विरोधक सरकारमध्ये होते, त्यावेळी काय स्थिती होती, याचीही त्यांनी माहिती दिली. या प्रसंगी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, भास्कर दानवे, किशोर अग्रवाल, सिद्धिविनायक मुळे, अशोक पांगारकर, अर्जुन गेही आदींची उपस्थिती होती.